
India vs New Zealand, Champions Trophy Final : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं विजेतेपद मिळवण्यापासून टीम इंडिया फक्त एक सामना दूर आहे. दुबईत रविवारी (9 मार्च 2025) रोजी होणाऱ्या मॅचमध्ये भारताची लढत न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. न्यूझीलंडच्या टीमनं यापूर्वी टीम इंडियाला धक्के दिले आहेत. मिचेल सँटनरच्या नेतृत्त्वाखाली खेळणारी ही टीम चांगलीच फॉर्मात असून त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय टीम करणार नाही.
भारत विरुद्ध न्यूझीलंड ही चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाला बारा वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. या मार्गात न्यूझीलंडच्या 5 खेळाडूंचा अडथळा आहे. भारतीय खेळाडूंसमोरचे हे पाच प्रश्न कोण आहेत ते पाहूया
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विल यंग (Will Young)
न्यूझीलंडचा हा ओपनर गेल्या काही महिन्यापासून फॉर्मात आहे. भारताविरुद्धची टेस्ट सीरिज जिंकण्यात त्याचं महत्त्वाचं योगदान होतं. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात त्यानं पाकिस्तान विरुद्ध सेंच्युरी झळकावली होती. यंगनं या स्पर्धेत आत्तापर्यंतच्या 4 मॅचमध्ये 37.50 च्या सरासरीनं 150 रन्स केले आहेत. मोठी खेळी करण्याची क्षमता यंगमध्ये आहे. भारतीय बॉलर्सना त्याला लवकर आऊट करावं लागेल.
( नक्की वाचा : IND vs NZ : विराट, रोहित, नाही तर 'हा' खेळाडू आहे न्यूझीलंडसाठी खतरनाक! बॅट चालली तर ट्रॉफी आपलीच! )
राचिन रविंद्र (Rachin Ravindra)
न्यूझीलंडचा डावखुरा ऑलराऊंडर चांगलाच फॉर्मात आहे. रविंद्र दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळला नव्हता. पण, त्यानंतर त्यानं बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरी झळकावली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक रन्स करण्याच्या यादीमध्ये रविंद्र सध्या नंबर 2 वर आहे. नंबर 1 वर असलेल्या बेन डकेतला मागं टाकण्यासाठी त्याला फक्त 2 रन्सची आवश्यकता आहे. रविंद्रची बॅट चालली की न्यूझीलंडची मॅचमधील स्थिती भक्कम होते. हा इतिहास आहे. त्यामुळे फायनलमध्ये त्याची विकेट झटपट मिळवणे भारतीय बॉलर्ससाठी आवश्यक आहे.
केन विल्यमसन (Kane Williamson )
केन विल्यमसन हा न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याच्यात दीर्घकाळ बॅटिंग करण्याची आणि एक बाजू लावून धरण्याची क्षमता आहे. तो सध्या फॉर्मात असून सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानं 102 रन्सची खेळी केली होती. भारतीय बॉलर्सविरुद्ध खेळण्याचा त्याला मोठा अनुभव आहे. ही न्यूझीलंडसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips)
न्यूझीलंडचा चांगला फिनिशर अशी फिलिप्सची ओळख असून तो वेगानं रन्स काढू शकतो. फिलिप्स सर्वोत्तम फिल्डर आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड विरुद्ध साखळी फेरीत झालेल्या मॅचमध्ये त्यानं विराट कोहलीची आश्चर्यकारक कॅच पकडला होता. फिलिप्स उपयुत्त स्पिनर असून दुबईतील पिचवर त्याची स्पिन बॉलिंग उपयोगी ठरु शकते.
( नक्की वाचा : IND vs NZ : टीम इंडियाला Good News, संपूर्ण देशाला रडवणारा खेळाडू फायनलमधून आऊट? )
मिचेल सँटनर (Mitchell Santner)
न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनरपासूनही भारताला सावध राहावं लागेल. दुबईतील पिचवर त्याची स्पिन बॉलिंग घातक ठरु शकते. आपल्या कॅप्टनशिपमध्ये न्यूझीलंडला विजेतेपद मिळवून देण्यासाठी सँटनर सज्ज झालाय. त्यामुळे तो फायनलला खेळ उंचावणार हे नक्की.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world