जाहिरात

Ichalkaranji Shraddha Academy : कोचिंग सेंटरच्या बाथरूममध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह, इजलकरंजीमध्ये खळबळ

इचलकरंजी शहरातील श्रद्धा अकॅडमी या खासगी कोचिंग सेंटरमधील बाथरूममध्ये एका बारावीतील विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे.

Ichalkaranji Shraddha Academy : कोचिंग सेंटरच्या बाथरूममध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह, इजलकरंजीमध्ये खळबळ

Ichalkaranji Shraddha Academy : इचलकरंजी शहरातील श्रद्धा अकॅडमी या खासगी कोचिंग सेंटरमधील बाथरूममध्ये एका बारावीतील विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. त्याने बाथरूममध्ये आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने इन्स्टिट्यूटमध्ये खळबळ उडाली आहे. करिअर करण्यासाठी तो या संस्थेत दाखल झाला. मात्र त्याने अचानक असं का केलं, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संतप्त जमावाने इन्स्टिट्यूटमध्ये तोडफोड केली.  श्रद्धा अकॅडमी या खासगी कोचिंग सेंटरविरोधात मृत विद्यार्थ्याच्या पालकांनीही हत्येसाठी जबाबदार धरलं आहे. त्यांनी मुलाची हत्या झाल्याचाही आरोप केला आहे.  

Lady Don: लेडी डॉन होणार आई! नवरा गँगस्टर तिहार जेलमध्ये बंद, पण आता...

Jun 17, 2025 21:38 pm IST

Lady Don: लेडी डॉन होणार आई! नवरा गँगस्टर तिहार जेलमध्ये बंद, पण आता...

मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजी शहरातील श्रद्धा अकॅडमी (Ichalkaranji Shraddha Academy) या खासगी कोचिंग सेंटरच्या बाथरूममध्ये यश यादव या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना  घडली आहे. बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप करत जमवाकडून संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्याच्या  पालकांनी ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप केला होता. दरम्यान जमावाकडून कोचिंग सेंटरची तोडफोड करण्यात आली. या तोडफोडीनंतर श्रद्धा अकॅडमीच्या बाहेर तणावाचे वातावरण झालं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com