Hingoli News : एका महिन्यात 5 वेळा मारहाण? जावयाचा झाला मृत्यू, सासू-सासरे,मेव्हणा अन् पत्नीने पुढं जे केलं..

हिंगोली शहरातील अकोला बायपास परिसरामध्ये कौटुंबिक वादातून  सासरच्या मंडळींनी जावयाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Hingoli Crime News Today

समाधान कांबळे, प्रतिनिधी

Hingoli Crime News : हिंगोली शहरातील अकोला बायपास परिसरामध्ये कौटुंबिक वादातून  सासरच्या मंडळींनी जावयाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सासरच्या मंडळीकडून झालेल्या मारहाणीत जावयाचा मृत्यु झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सासरच्या लोकांनी जावयाला एकाच महिन्यात पाच वेळा बेदम मारहाण केल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. राजू पापणकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.परंतु, खुनाचा गुन्हा दाखल केला नसल्याने नातेवाईकांनी हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात पाच लिटर पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. जावयाचा मृत्यूची घटना घडल्यानंतर सासू-सासरे,मेव्हणा आणि पत्नी हे फरार झाले आहेत.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News पुण्यात दहावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट, Telegram ग्रुप अ‍ॅडमिन विद्यार्थ्याला अटक

पेट्रोलने भरलेली कॅन हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला

पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात पोलीस अधीक्षकांच्या सुरक्षारक्षकाने नातेवाईकांच्या हातातून पेट्रोलने भरलेली कॅन हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. मारहाणीमुळे राजूचा मृत्यू झाला नसल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करू असे आश्वासन दिल्यानंतर आत्मदहन करण्यासाठी आलेले नातेवाईक शांत झाले होते. राजूच्या मुलांनाही त्यांच्या सासऱ्याकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.