Vardha Crime News Today : भारतीय सैन्यदलातील एका मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याने कनिष्ठ सैन्य अधिकाऱ्याला गोळी घातली.पुलगाव येथील सेंट्रल अॅम्युनिशन डेपो (CAD) येथे नियमित सराव सत्रादरम्यान झालेल्या गोळीबारात डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स (DSC)मधील एका ज्युनियर कमिशन्ड अधिकाऱ्याचा शुक्रवारी मृत्यू झाला.पण ही हत्या असल्याचं उघडकीस आलं. याप्रकरणी वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस ठाण्यात मनन तिवारी यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम बहादूर खांड असं मृत कनिष्ठ सैन्य अधिकाऱ्याचे नाव आहे.तर मनन तिवारी असं गोळी मारणाऱ्या मेजर दर्जाच्या आरोपीचे नाव आहे.
भारतीय सैन्याकडून आरोपी मनन तिवारीची चौकशी सुरु
मिळालेल्या माहितीनुसार,वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील सेंट्रल अॅम्युनिशन डेपो (Central Ammunition Depot-CAD) मधील ही घटना आहे .
देशभरातील ऑर्डिनेन्स फॅक्टरीमध्ये तयार झालेला दारुगोळा वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील सेंट्रल अॅम्युनिशन डेपो (CAD) येथे ठेवला जातो.
नक्की वाचा >> IPS Transfer: महाराष्ट्रातील 24 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, 'त्या' अधिकाऱ्यांचाही समावेश, पाहा यादी
पुलगाव येथील सेंट्रल अॅम्युनिशन डेपो (CAD) ला डिफेन्स सेक्युरिटी कॉर्प्स (Defence Security Corps-DSC) या भारतीय सैन्याच्या युनिटकडून सुरक्षा पुरविली जाते. दोन्ही अधिकारी DSC मध्ये कार्यरत होते. भारतीय सैन्याकडून आरोपी मनन तिवारी याची चौकशी वर्धा पोलीस करत आहे.