रिझवान शेख, प्रतिनिधी
Thane Shivsena vs BJP Clash : ठाणे महापालिकेच्या महासभेत आज पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले. महासभेदरम्यान शेकडो कोटी रुपयांच्या जवळपास 250 कामांना अवघ्या काही मिनिटांत मंजुरी देण्यात आली, असा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे.या कामांची सविस्तर माहिती सभागृहात देण्यात आली नसल्याने भाजप नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
महासभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान राजकीय वातावरण तापले. भाजप नगरसेवकांनी आरोप केला आहे की,शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही. तसेच सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.यावेळी काही भाजप नगरसेवक थेट महासभेच्या पोडियमवर चढून घोषणाबाजी करताना दिसले.
राष्ट्रगीत संपल्यानंतर भाजप नगरसेवकांनी घातला गोंधळ
दरम्यान,प्रस्ताव मंजूर केल्यानंतर अचानक राष्ट्रगीत सुरू करण्यात आल्यानेही वाद निर्माण झाला.सभा सुरू असतानाच राष्ट्रगीत सुरू करून त्याचा अपमान झाल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला.राष्ट्रगीत संपल्यानंतर भाजप नगरसेवकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी नौपाडा पोलीस ठाण्याकडे पायी मोर्चा काढत शिवसेना शिंदे गटाच्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
नक्की वाचा >> IPS Transfer: महाराष्ट्रातील 24 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, 'त्या' अधिकाऱ्यांचाही समावेश, पाहा यादी
शिवसेना शिंदे गटातील संघर्ष पुन्हा उफाळून आला
राज्यात महायुती सरकार एकत्र काम करत असले,तरी ठाणे महापालिकेत मात्र भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष पुन्हा उफाळून आल्याचं पाहायला मिळत आहे.ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक नगरसेवक असले, तरी भाजपचे 29 नगरसेवक सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत.त्यामुळे आगामी काळात ठाण्यात भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे,अशी प्रतिक्रिया भाजपचे उप महापौर कृष्ण पाटील यांनी दिली आहे.
नक्की वाचा >> Amravati News: 45 अंशात भाजपच्या 'या' मंत्र्याचा शाही दौरा, हेलिपॅड सज्ज, PM मोदींच्या आवाहनाला केराची टोपली
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world