MBA Student Murder Case: मध्य प्रदेशातील इंदूरच्या द्वारकापुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ वर्षीय एमबीए विद्यार्थिनीची निर्घृण हत्या करणाऱ्या पीयूष धनोतिया याची कोर्टाने तुरुंगात रवानगी केली आहे. इंदूरमध्ये क्रूर कृत्य केल्यानंतर तो पनवेलसह अनेक ठिकाणी लपून बसला होता. अखेर मुंबईच्या अंधेरी परिसरातून त्याला अटक करण्यात आली. पोलीस चौकशीत त्याने जे खुलासे केले आहेत, ते ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत.
मृतदेहावर बलात्कार...
इंदूरमध्ये २५ वर्षीय एमबीए विद्यार्थी हत्याकांड प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. आरोपी पीयूष धनोतिया याने दिलेली माहिती ऐकून पोलीसही चक्रावून गेले. त्याने प्रेयसीच्या मृतदेहासोबत दुष्कृत्य करण्यासाठी सेक्स पॉवर वाढवणाऱ्या गोळ्या घेतल्या होत्या. प्रेयसीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याच्या संशयावरुन त्याने प्रेयसीची गळा दाबून हत्या केली होती. हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहाचे आक्षेपार्ह फोटो काढले आणि ते इन्स्टाग्राम व व्हॉट्सॲपवर व्हायरल केले. हत्येनंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि निर्वस्त्र अवस्थेत तिला घरात सोडून पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०२५ रोजी पीयूष आणि एमबीए विद्यार्थिनीची भेट झाली होती. यानंतर ते लिव्ह इनमध्ये राहत होते. १० फेब्रुवारी २०२६ रोजी त्याने प्रेयसीचा गळा दाबुन तिची हत्या केली.
पश्चाताप झाला म्हणून तंत्र-मंत्राची घेतली मदत...
आरोपीने पोलिसांना सांगितले की, हत्येनंतर त्याला पश्चात्ताप झाला होता आणि त्याला प्रेयसीची माफी मागायची होती. यासाठी त्याने यूट्यूबवर 'मृतांचा आत्मा कसा बोलवायचा' याचे व्हिडिओ पाहिले आणि त्याद्वारे तिच्या आत्म्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सध्या इंदूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.