Instagram मुळे अख्ख्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, रस्त्यावरच रक्तरंजित खेळ, अंगावर काटा आणणारी कहाणी

सोशल मीडियावर केलेली एक कमेंट किती घातक ठरू शकते, याचं एक भयानक उदाहरण समोर आलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Family Clash Crime News

Crime News Today : डिजिटल जगात इन्स्टाग्रामचं वेड लागलेल्या काही लोकांसोबत धक्कादायक घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे.रिल्सचे व्हिडीओ बनवून लोकांसमोर हिरोगिरी करणाऱ्या अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. सोशल मीडियावर केलेली एक कमेंट किती घातक ठरू शकते, याचं एक भयानक उदाहरण समोर आलं आहे. 

देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये अशीच एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका इन्स्टाग्राम रीलवर केलेल्या एका कमेंटमुळे एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उत्तर दिल्लीतील सदर बाजार परिसरात एका छोट्याशा ऑनलाइन वादाचे इतके भयंकर परिणाम होतील, याचा कोणी विचारही केला नसले. याच कारणामुळे एका व्यक्तीला जीव गमावावा लागला आहे. 

काय आहे प्रकरण?

राजधानीच्या मोतिया खान भागात राहणारा सतीश त्याच्या मुलीच्या लग्नात आनंदात होते.त्याच्या मुलीनं 18 फेब्रुवारीला कृष्णा नावाच्या तरुणासोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. 23 फेब्रुवारीला रिसेप्शनची तयारी जोरात सुरू होती. पण एका सोशल मीडिया पोस्टमुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळेल,याची कोणाला कल्पनाही नव्हती.

नक्की वाचा >>  T20 World Cup 2026 : भारताचा पराभव अन् विंडिजचा विजय..वर्ल्डकपमध्ये उलथापालथ, कोण कोण गाठणार सेमी फायनल?

20 फेब्रुवारीच्या रात्री 9.15 वाजताच्या सुमारास सतीशच्या मुलीनं लग्नाची एक स्टोरी इंस्टाग्रामवर टाकली. या स्टोरीवर सतीश यांच्या पुतण्याच्या मुलीने एक वादग्रस्त कमेंट केली. "हिची स्टोरी बघ,आठवडे 4 राहिले पळून गेल्यानंतर.",अशाप्रकारची कमेंट तिने केली होती. त्यानंतर सतिशच्या मुलीनं त्या तरुणीला फोन करून म्हटलं की, ती पळून गेलेली नाही,तर तिने कोर्ट मॅरेज केलं आहे. पण वाद मिटण्याऐवजी आणखी वाढला. कमेंट केलेल्या तरुणीचा भाऊ अमन फोनवर आला आणि सतीशच्या मुलीला शिवीगाळ करत तिला धडा शिकवण्याची धमकी दिली.

Advertisement

रस्त्यावर रक्तरंजित खेळ

सतीश त्याची पत्नी आणि मुलगी हे प्रकरण समजावण्यासाठी आरोपींच्या घराजवळील ‘गली पीपल वाली'मध्ये गेल्या. तिथून परत येताना आरोपींनी त्यांना रस्त्यातच अडवले. पोलीस रिपोर्टनुसार,आरोपी अमन, त्याचे वडील अश्वनी आणि बहीण रश्मी यांनी सतीशवर हल्ला चढवला.
आरोप करण्यात आला आहे की, रश्मीच्या सांगण्यावरून अमनने चाकू काढला आणि सतीशच्या छातीत खुपसला. त्यानंतर आरडाओरड सुरू झाली. सतीशच्या पत्नीने पती सतीशला वाचवण्याचा प्रयत्न केला.पण आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. जखमी सतीशला लेडी हार्डिंग रुग्णालयात नेण्यात आले,पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

डीसीपी राजा बांठिया यांनी म्हटलंय की,इन्स्टाग्रामवरील सोशल मीडिया कमेंट्सवरून झालेला वादच या हत्येचे मुख्य कारण ठरला.या हत्याकांडानंतर रश्मी,अमन आणि त्याचे वडील अश्वनी हे तिन्ही आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी त्यांच्या मोबाईल फोनच्या वेगवेगळ्या लोकेशन्सच्या आधारे त्यांचा माग काढला.अमनला बाहेरील दिल्लीतील बक्करवाला परिसरातून,तर त्याची बहीण रश्मी आणि वडील अश्वनी यांना गाझियाबादमधील नंदग्राम येथून अटक करण्यात आली.

Advertisement