T20 World Cup 2026: सध्या टी-20 वर्ल्डकपचा थरार सुरु असून वर्ल्ड कपच्या गट फेरीत अनेक मोठे उलटफेर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत करून स्पर्धेबाहेरचा मार्ग दाखवला. तर युरोपहून आलेल्या इटलीच्या संघाने नेपाळला हरवले.नेपाळने इंग्लंडला चांगलाच फटका दिला,तर दक्षिण आफ्रिकेला अफगाणिस्तानला हरवण्यासाठी डबल सुपर ओव्हरचा सामना खेळावा लागला. यासोबतच कोणती टीम कुठे उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे,याचं चित्रही स्पष्ट झालं आहे.
अहमदाबादमध्ये सुपर-8 च्या सामन्यात चाहत्यांना भारताच्या पराभवाची अजिबात अपेक्षा नव्हती. दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 76 धावांनी पराभव केला होता. दुसरीकडे वेस्ट इंडिजने झिंबाब्वे विरुद्ध झालेल्या सामन्यात 6 बाद 254 धावा केल्या होत्या. या सामन्यात वेस्ट इंडिजने 107 धावांनी अफ्रिका संघाचा धुव्वा उडवला. सुपर-8 मध्ये आता विंडीजचा संघ गट-1 मध्ये अव्वल स्थानावर आहे.
दोन वेळा चॅम्पियन (2012, 2016) ठरलेली विंडीज टीम या वर्ल्डकपमध्येही प्रबळ दावेदार म्हणून छाप टाकत असल्याचं समोर येतंय. यापूर्वी विंडीजने गट सामन्यांमध्ये इंग्लंड,स्कॉटलंड इटली आणि नेपाळचा पराभव केला होता. सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेनं धडा शिकवला.विंडीजचा संघ 26 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेला (अहमदाबादमध्ये) आणि 1 मार्चला भारता विरोधात (ईडन गार्डन्सवर) मैदानात उतरणार आहे.
वेस्ट इंडिज टीमचा फॉर्म पाहता इतर संघांसमोर यापुढील सामन्यांमध्ये मोठं आव्हान असणार आहे. दुसरीकडे टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहोचणं कठीण झालं आहे. टीम इंडिया 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वे विरुद्ध चेन्नईत आणि 1 मार्चला वेस्ट इंडिजविरोधात कोलकात्यात खेळणार आहे. टीम इंडियाला हे दोन्ही सामने चांगल्या रन रेट्सने जिंकावे लागतील. नाहीतर सर्व काही रन रेट्सच्या गणिती समीकरणांवर अवलंबून राहील.
नक्की वाचा >> T20 World Cup 2026: सगळीकडे फक्त NRR ची चर्चा, भारत सेमी फायनल गाठणार का? काय आहे नेट रन-रेटचा फॉर्म्युला?
कोणत्या संघाची सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची जास्त शक्यता?
ग्रुप-2 मध्ये पाकिस्तानसाठीही सेमीफायनल गाठणे आता सोपे राहिलेले नाही. ग्रुप-2 मधील दोन सामन्यांचा रिझल्ट समोर आला नाही. अशा परिस्थितीत ग्रुप-2 मध्ये फक्त इंग्लंडकडे सुपर-8 मधील 2 गुण आहेत. त्यामुळे ग्रुप-2 मधील पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंका या तीन संघांमध्ये सध्या जोरदार टक्कर दिसत आहे. त्यामध्ये इंग्लंडची स्थिती थोडीफार चांगली मानली जात आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले तरीही अशी शक्यता आहे की त्यांची लढत फाइनलमध्ये होईल. कदाचित होणार नाही.
सेमीफायनल-1 चं आयोजन 4 मार्चला कोलंबोच्या आर.प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. तर सेमीफायनल-2 चं आयोजन 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. परंतु ESPNcricinfo च्या माहितीनुसार, ICC ने त्यांना सांगितले आहे की सेमीफायनल-1 चा सामना कोलंबो किंवा कोलकाता या दोन्हीपैकी कुठेही होऊ शकतो.
कोण, कुठे खेळणार सेमीफायनल?
पाकिस्तान सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाला,तर 4 मार्चला कोलंबोमध्ये सेमीफायनलचा सामना खेळेल.पाकिस्तानचा संघ क्वालिफाय झाला नाही आणि श्रीलंका क्वालिफाय झाली आणि त्यांचा सामना भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही संघाशी असेल, तर तो नॉकआउट सामना कोलंबोमध्ये खेळला जाईल.श्रीलंका आणि पाकिस्तान दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले नाहीत,तर हा सेमीफायनल सामना कोलकाता येथे खेळला जाईल.दुसरा सेमीफायनल सामना मुंबईत खेळला जाईल.टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचली,तर ती पाकिस्तानशिवाय इतर कोणत्याही संघाविरुद्ध त्यांचा सामना मुंबईमध्ये खेळेल. भारत,पाकिस्तान आणि श्रीलंका तिन्ही संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले नाहीत, तर सेमीफायनल सामने कोलकाता आणि मुंबई येथे खेळवले जातील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world