IPL Satta : सध्या देशभरात आयपीएलची धूम आहे. आपली आवडती टीम जिंकणार का? आवडता खेळाडू कसा खेळणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचवेळी आयपीएलच्या मॅचवरील सट्टाबाजारही जोरात आहे. या सट्ट्याचे व्यसन लागले की तुम्ही तुम्ही गुन्हेगार किंवा लुटारू देखील बनू शकता. अशीच एक धक्कादायक घटना उघड झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील एक तरुण आयपीएल सट्ट्याच्या व्यसनात अडकला. त्यामधून तो कर्जात बुडला आणि त्यानंतर त्यानं लुटमार केली. या आरोपीने खेळण्यातील कट्ट्याचा धाक दाखवून एका वृद्ध महिलेची सोन्याची चेन लुटली. विशेष म्हणजे, लुटारू दुसरा कुणी नसून त्यांचा शेजारीच आहे.
( नक्की वाचा : एक्सप्रेस-वे वर महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत सापडले भाजपा नेते, CCTV मध्ये झालं सर्व रेकॉर्ड )
लग्नाचे कार्ड घेऊन घरात प्रवेश
घटनेदरम्यान, गंजबासौदाच्या पॉश कॉलनीमध्ये दुपारी 77 वर्षांची महिला एकटीच होती. तेव्हा आरोपी तरुण हातात लग्नाचे कार्ड घेऊन घरात शिरला. पुढच्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर मास्क आणि हातात बंदूक होती. महिलेला त्याची चलाखी समजली नाही आणि ती घाबरली. तेव्हा लुटारू चेन हिसकावून फरार झाला.
आरोपीकडून गुन्हा कबूल
पोलिसांच्या तपासात सीसीटीव्ही आणि कॉल रेकॉर्डमुळे हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांच्या चौकशीत तरुणाने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आयपीएल सट्ट्यात लाखो रुपये गमावले होते. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला हा तरुण मानसिक दबावात होता आणि अखेरीस त्याने खेळण्यातील पिस्तुलाने खरी लूट करण्याची योजना आखली.
( नक्की वाचा : ग्रेटर नोएडामध्ये Gay App गँगनं केली आणखी एक शिकार, वाचा कसं विणलं जातंय तरुणांभोवती जाळं )
तो काही काळापासून जुगार आणि सट्ट्यात मोठ्या प्रमाणात अडकला होता. पैशांची चणचण आणि तणावामुळे त्याने ही चोरी केली, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली
आहे.