
Viral Video: मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये एका नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. व्हिडिओमध्ये कारमधील कथित भाजप नेता एका महिलेसोबत रस्त्यावर आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हे संपूर्ण प्रकरण प्रदेश नेतृत्त्वाच्या निदर्शनास आणले आहे, त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असं भाजपाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे, मंदसौर पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घेऊन एफआयआर (FIR) दाखल केला आहे.रतलाम रेंजचे डीआयजी मनोज कुमार सिंह यांनीही चौकशीनंतर कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे.
व्हिडिओमध्ये काय?
कथित भाजप नेत्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हे विशेष. व्हिडिओमध्ये नेताजी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर महिलेसोबत पूर्णपणे आक्षेपार्ह स्थितीत आहेत.
( नक्की वाचा : गौतमी पाटीलला बैलासमोर नाचवलं! वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक प्रताप उघड, पाहा Video )
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवर कारमध्ये महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसणारी व्यक्ती भाजप नेते मनोहर लाल धाकड असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ 21 मे 2025 रोजी रात्री उशिरा सोशल मीडियावर अपलोड झाला. त्यानंतर हा अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ महामार्गावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता.
व्हायरल व्हिडिओमध्ये us दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर कारमध्ये एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओ आणि कार नंबरच्या आधारे हा व्हिडिओ भाजप नेत्याचा असून ते वॉर्ड क्रमांक 8 मधील जिल्हा परिषद सदस्य सोहनबाई धाकड यांचे पती असल्याचे म्हंटले जात आहे.
( नक्की वाचा : ग्रेटर नोएडामध्ये Gay App गँगनं केली आणखी एक शिकार, वाचा कसं विणलं जातंय तरुणांभोवती जाळं )
कारवाईला उशीर का?
भाजपा नेत्यावर कारवाई झाली तर त्यांच्या पत्नी सोहनबाई धाकड पक्षाची साथ सोडतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजपा अल्पमतात येऊ शकते. जिल्हा परिषदेतील 17 सदस्यांपैकी 9 सदस्य भाजप समर्थक आहेत, तर 8 काँग्रेस समर्थक आहेत.
दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणतीही अप्रिय परिस्थिती टाळण्यासाठी कारवाईचा मार्ग शोधण्याचा भाजपा प्रयत्न आहे. भाजपच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही घटनेवर कारवाई झाली पाहिजे. हे प्रकरण प्रदेश नेतृत्वाच्या निदर्शनास आणले आहे आणि लवकरच निर्णय घेतला जाईल, असे प्रदेश प्रवक्ते यशपाल सिंह सिसोदीया यांनी स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world