बदलापूर प्रकरणानंतर प्रशासनात मोठा बदल, भाजपनेही आरोप केलेल्या अधिकाऱ्याची गृहखात्यात वर्णी

बदलापूरमधील प्रकरणाचे मोठे पडसाद गृहखात्यात उमटले आहेत. राज्य सरकारनं मोठा निर्णय घेत इकबाल सिंग चहल यांची अतिरीक्त गृह सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याचं प्रकरण उघड झालं आहे. या प्रकरणामुळे राज्यभर संताप व्यक्त करण्यात येतोय. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. हे प्रकरण हातळण्यास गृहखाते अपयशी ठरलं अशी टीका विरोधकांनी केलीय. त्याचवेळी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेत इकबाल सिंग चहल यांची अतिरीक्त गृह सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडं या खात्याचा अतिरिक्त चार्ज होता. विशेष म्हणजे चहल यांच्यावर यापूर्वी भाजपाकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीनंतर विरोधकांना टीका करण्याचा आयता मुद्दा मिळाला आहे.

कोण आहेत चहल?

 चहल यापुर्वी  मुख्यमंत्री सचिवालयाच्या प्रभारी अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत होते. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तत्कालिन मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांची मार्च 2024 मध्ये आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती.

लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाच्या घोषणेनंतर, केंद्रीय निवडणुक आयोगाने राज्य सरकारला इक्बालसिंह चहल ज्याच्यासह ज्यांनी 3 वर्षाहून अधिक काळ सेवेत आहेत अशा इतर नागरी आयुक्त आणि अतिरिक्त किंवा उपमहापालिका आयुक्तांची बदली करण्याचे आदेश दिले होते.

( नक्की वाचा : बदलापूरच्या असंवेदनशील महिला पोलीस अधिकाऱ्याला आणखी एक दणका )

1989 च्या बॅचचे IAS अधिकारी असलेले इक्बाल सिंह चहल यांची 8 में 2020 रोजी प्रवीण परदेशी यांच्या जागी महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. याचबरोबर माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांचीही मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागात सचिव म्हणून बदली आणि नियुक्ती करण्यात आली.

चहल यांची वादग्रस्त कारकिर्द

आदित्य ठाकरे यांनी मुंबईत रस्त्यावरील फर्निचर बसवण्यासाठी 263 कोटी रुपयांची निविदा जारी करताना तत्कालीन बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. आदित्य ठाकरे यांनी या विषयावर चहल यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले होते आणि हा मुद्दा विधानसभेच्या अधिवेशनातही गाजला होता. 

Advertisement

आयएएस अधिकारी इक्बाल सिंग चहल यांच्यावर कोव्हिड महामारीच्या काळात बॉडी बॅगच्या खरेदी-विक्रीत घोटाळे झाल्याचा आरोप आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्वत: मुंबई उच्च न्यायालयात पीएपी घोटाळ्याचा आरोप करत जनहित याचिका दाखल केली होती. सोमय्या यांनी दिल्लीला जाऊन या आरोपाशी संबंधित कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांना सुपूर्दही केली होती.

( नक्की वाचा : 'लाडकी बहीण' योजनेला बदनाम करण्यासाठीच बदलापुरात रेल रोको आंदोलन' मुख्यमंत्र्यांचा थेट आरोप )

चहल यांच्या नियुक्तीनंतर विरोधकांनी टिकेची झोड उटवली आहे. ईडी तपास, कोविड काळातील घोटाळ्याचे आरोप, फर्निचर घोटाळा असे आरोप असलेल्या अधिकाऱ्यावर सरकार इतकी मेहरबान का असा सवाल ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी विचारला आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून ही नियुक्त करण्यात आली आहे का असा प्रश्न देखील विचारला जातोय

Advertisement