कर्ज फेडण्यासाठी नातवाने उचलले टोकाचे पाऊल, 80 वर्षीय आजीविरोधात रचला गंभीर कट

नातवाने आपल्या 80 वर्षीय आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावातील पाचोरा तालुक्यामध्ये घडली आहे. काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Advertisement
Read Time: 2 mins

Jalgaon Crime News: नातवाने आपल्या 80 वर्षीय आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावातील पाचोरा तालुक्यामध्ये घडली आहे. विशाल प्रभाकर भोई असे आरोपीचे नाव आहे. विशाल हा पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केवळ चार तासांमध्ये घटनेचा तपास करत विशाल भोईच्या मुसक्या आवळल्या.  

(नक्की वाचा: खिचडी कमी वाढली, पतीचा संताप, थेट पत्नीचा केला खून)

हत्येमागील धक्कादायक कारण समोर  

विशाल भोईच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. कर्ज फेडण्यासाठी आजी मदत करत नाही म्हणून नातवाने चक्क आजीची हत्या करण्यासाठी टोकाचे पाऊल उचलले. आजीची हत्या करून तिच्या अंगावरील दागिने काढून त्याने विकले. गुन्हा लपवण्यासाठी विशाल भोई हॉस्पिटलमध्ये दुःख व्यक्त करण्याचे नाटक करत होता. पण पोलिसांनी गुन्ह्यामागील खरा गुन्हेगार काही तासांमध्येच शोधून काढला. 

Advertisement

(नक्की वाचा: बाप लेकीच्या नात्याला डाग, तेरा वर्षीय लेकीवर बापानेच टाकला हात)

नेमके काय आहे प्रकरण?

मांजाबाई दगडू भोई असे हत्या करण्यात आलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. मांजाबाई नातू विशालसोबत पिंपळगाव हरेश्वर गावामध्ये राहत होत्या. विशाल त्याच्यावर असणारे कर्ज फेडण्यासाठी आजीकडे वारंवार पैशांची मागणी करायचा. पण आजीने मदत करण्यास नकार दिल्याने विशालने तिचा गळा दाबून हत्या केल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली. हत्या करून विशालने आजीच्या अंगावरील सोने काढून घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी वृद्ध महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयामध्ये पोस्टमार्टेमसाठी दाखल केला. यादरम्यान आजीच्या अंगावरील दागिने विकून विशाल रुग्णालयामध्ये पोहोचला व दुःख व्यक्त करण्याचे नाटक करू लागला. त्याचे नाटक फार काळ टिकू शकले नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवघ्या चार तासांमध्ये घटनेचा तपास करून आरोपी विशाल भोईला अटक केली. 

Advertisement

(नक्की वाचा: दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून बायकोची हत्या; आरोपी पती फरार)

VIDEO: 8 दिवसांनी आंघोळ करण्याची पाळी या गावांत दारु मिळते पण पाणी नाही

Topics mentioned in this article