Jalgaon Fraud: वॉशिंग मशिन दुरुस्तीसाठी कॉल.. अवघ्या काही सेकंदात लागला लाखोंचा चुना, कशी झाली फसवणूक?

Jalgaon Cyber Fraud News: ऑटोमॅटिक डाउनलोड झालेल्या APK फाईलमुळे घडले. पीडित निलेश सराफ यांनी तात्काळ सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव:

Jalgaon Cyber Fraud: घरगुती वॉशिंग मशीन खराब झाल्याने कंपनीचा कस्टमर केअर नंबर शोधत असताना गुगलवर सर्च केलेल्या नंबरवर कॉल केल्यावर मोबाईल हॅक होऊन तब्बल ४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये समोर आला आहे. हे सर्व फसवणूक कॉल दरम्यान आलेल्या ओटीपीमुळे ऑटोमॅटिक डाउनलोड झालेल्या APK फाईलमुळे घडले. पीडित निलेश सराफ यांनी तात्काळ सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ळगाव शहरातील रहिवासी निलेश सराफ यांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. सराफ यांच्या घरातील वॉशिंग मशीन अचानक बंद पडली. दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी गुगलवर वॉशिंग मशीन कस्टमर केअरचा नंबर शोधला. यावेळी सापडलेल्या एका  नंबरवर त्यांनी कॉल केला. कॉल दरम्यान, सराफ यांच्या मोबाईलवर एक ओटीपी (वन टाईम पासवर्ड) आले.  याचवेळी त्यांच्या मोबाईलमध्ये एक APK फाईल (अँड्रॉइड पॅकेज किट) ऑटोमॅटिक डाउनलोड होऊ लागली. 

Pune News: ऑनलाईन ओळख, गर्लफ्रेंड होण्यासाठी गळ, 'तिचा' नकार येताच AI च्या मदतीने भयंकर कांड

सराफ यांना याची कल्पना नसताना ही फाईल इंस्टॉल होऊन गेली आणि त्यांचा मोबाईल हॅक झाला. हॅकर्सनी त्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रवेश करून विविध व्यवहार केले. केवळ काही तासांतच त्यांच्या खात्यातून ४ लाख ६५ हजार रुपये उडवले गेले. यात दोन बँक खात्यांमधील बचत रक्कम आणि एका क्रेडिट कार्डमधील मर्यादा यांचा समावेश आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Pune News: गावगुंडाची दहशत, शहरात पुन्हा वाहनांची तोडफोड, थरारक CCTV आला पुढे

Topics mentioned in this article