
सुरज कसबे
कधी कोयता गँगची दहशत तर कधी चड्डी गँगचा धुमाकूळ यामुळे पुण्यातील वातावरण बिघडून गेले आहे. पुणे म्हणजे शिक्षणाचे माहेर घर. पण त्याची ओळख पुसली जात आहे. पुण्यात या घटना वारंवार घडताना पाहील्या आहेत. पुणं जस जसं वाढत आहे तस तसं इथल्या गुन्हेगारीमध्ये ही वाढ झाली आहे. पुण्याच्या शेजारी असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये ही याचे लोण पसरले आहेत. इथंही गुन्हेगार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. त्यात गाव गुंडांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. ताथवडे परिसरात एका खाजगी कंपनीच्या गोदामाबाहेर उभ्या असलेल्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची एका माथेफिरू गावगुंडाने तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार अंमली पदार्थांचे सेवन करून या गावगुंडाने वाहनांचे मोठे नुकसान केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही तोडफोड कैद झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड करणे ही जणू एक स्टाईल बनली आहे.
या घटनेत अंदाजे चार ते पाच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर घटनेनंतर आता वाकड पोलीस या गावगुंडाच्या मुसक्या कशा आवळतात आणि त्याच्यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही या घटनांना आळा घातला पाहीजे अशी नागरिकींची मागणी आहे. अशा घटना सतत होत असल्याने एक प्रकार भितीचे वातावरण संपूर्ण परिसरात आहे.
नक्की वाचा - Pune News: धक्कादायक! राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये रॅगिंग? कॅडेटसोबत भयंकर घडलं
अशा घटना वारंवार होत असतील तर पोलीसांचा आणि कायद्याचा धाक या गावगुंडांना आहे की नाही असा प्रश्नही नागरिक आता उपस्थित करत आहेत. शहरातच सुरक्षित वातावरण नसेल तर दुसरीकडे काय असा प्रश्नही उपस्थित होत आहे. अनेक जण तर रस्त्यावर आणि पार्कींगमध्ये गाड्या उभ्या करायच्या की नाही याचा विचार करत आहेत. कधी त्यांच्या गाडीची तोडफोड होईल याचा नेम नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीसांना यावर रामबाण औषध शोधावे लागणार आहे. नाही तर या घटना यापुढे ही होतच राहतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world