Jalgaon Crime: लुटायला आले, प्लॅन फसला.. थेट पान टपरी चालकावर गोळीबार, जळगावात खळबळ

पान टपरीवर आलेल्या चार अज्ञातांनी पान टपरी वरील काही रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला यातूनच गोळीबार करण्यात आला.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव:

Jalgaon News: भुसावळ शहरातील जळगाव नाका परिसरात पान टपरी चालकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  पान टपरीवर आलेल्या चार अज्ञातांनी पान टपरीतील काही रक्कम लुट्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रतिकार करताना एका अज्ञाताने पान टपरी चालकावर गोळीबार केला. या गोळीबारात पान टपरी चालक उल्हास गणेश पाटील यांच्या खांद्याला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. 

 नेमकं काय घडलं?

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातल्या जळगाव नाका परिसरात पान टपरी चालकावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली असून या घटनेत पान टपरी चालक हा गंभीर जखमी झाला आहे. पान टपरीवर आलेल्या चार अज्ञातांनी पान टपरी वरील काही रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला.

Pakistani Don: 'माफी मागा नाही तर...', डॉनची पाकिस्तानातून थेट मुख्यमंत्र्यांना धमकी, प्रकरण तापलं

यातूनच प्रतिकार करताना एका अज्ञाताने टपरी चालक उल्हास गणेश पाटील यांच्यावर गोळीबार करून हल्लेखोर पसार झाले असून गोळीबाराच्या घटनेत टपरी चालकाच्या उजव्या खांद्याला गोळी लागल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सद्यस्थितीत टपरी चालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच फरार झालेल्या हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Beed News: कला केंद्र, लॉज अन् ते 4 जण!, बारामतीच्या तरुणीसोबत आळीपाळीने बीडमध्ये भयंकर कृत्य

Topics mentioned in this article