Jalgaon News : हनी ट्रॅप प्रकरणाची पाळमुळं जळगावपर्यंत; प्रफुल्ल लोढावर पॉस्कोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल

जळगावच्या जामनेरमधील प्रफुल्ल लोढावर साकीनाका आणि अंधेरी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

मंगेश जोशी, प्रतिनिधी

नाशिकमधील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणात (Honey trap Case) 72 अधिकारी आणि नेते अडकल्याची चर्चा सुरू असताना हनी ट्रॅप प्रकरणाची पाळमुळं जळगाव पर्यंत पोहोचलेले आहेत. हनी ट्रॅप प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात मुंबईत पोस्कोअंतर्गत बलात्कार आणि हनी ट्रॅप प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रफुल लोढा यास अटक देखील करण्यात आली आहे. प्रफुल्ल लोढा यास अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून जळगाव जामनेर व पहूर या ठिकाणी प्रफुल्ल लोढा यांच्या मालमत्तेची तपासणी करत लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक डिवाइस पोलिसांनी जप्त केली आहेत.
 
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या पहूर येथील मूळ रहिवासी असलेल्या 62 वर्षीय प्रफुल्ल लोढा याच्यावर नोकरीचे आमिष देऊन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत छायाचित्र काढत प्रसारित करण्याची धमकी व मुलींना डांबून ठेवल्याचे गंभीर आरोप असून या आरोपावरून मुंबईत साकीनाका पोलीस स्टेशन आणि अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशन या ठिकाणी पोस्को, बलात्कार, खंडणी व हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी प्रफुल्ल लोढा याला अटक केली आहे. त्यामुळे नाशिकमधील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणानंतर हनी ट्रॅपची पाळमुळं ही जळगावपर्यंत पोहचली असल्याचे म्हटलं जात आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Live-in partner murder : लिव्ह-इन-पार्टनरची हत्या, तैनात असलेल्या पोलीस ठाण्यात दिली कबुली; हैराण करणारा गुन्हा

कथित समाजसेवक म्हणून वावरणाऱ्या प्रफुल्ल लोढाचा मुंबईतील चकाला परिसरात चकाला हाऊस नावाने बंगला असून नोकरीचे आमिष दाखवून 16 वर्षीय मुलीवर तिच्या मैत्रिणीसह अत्याचार, तिचे अश्लील छायाचित्र काढून प्रसारित करण्याची धमकी देत घरात डांबून मारहाण केल्याप्रकरणी 3 जुलै रोजी साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 5 जुलै रोजी प्रफुल्ल लोढा याला पोलिसांनी अटक केली होती. तर 14 जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये प्रफुल्ल लोढावर पोस्को, बलात्कार खंडणीसह हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

Advertisement

प्रफुल्ल लोढाच्या अटकेनंतर जळगाव जामनेर आणि पहूर या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून लोढाच्या मालमत्तेची झाडाझडती घेतली. यात जामनेर मध्ये असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससह पहुरमधील घराची ही झाडाझडती घेऊन कागदपत्र तपासण्यात आली. या छाप्यात पोलिसांनी एक लॅपटॉप, दोन पेन ड्राईव्ह आणि काही इलेक्ट्रॉनिक डिवाइस जप्त केले असून यातून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Advertisement

कथित समाजसेवक व आरोग्यदूत मिरवणाऱ्या प्रफुल्ल लोढाचे जिल्ह्यातील काही मातब्बर नेत्यांशी संबंध असल्याचे बोलले जात असून काही नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप प्रफुल्ल लोढाने केले आहे. त्यामुळे प्रफुल्ल लोढा हा कायम वादग्रस्त राहिला आहे. 

नक्की वाचा - Beed Crime: बीडमध्ये सैराट! प्रेयसीने घरी बोलावलं, अचानक नातेवाईक आले, पुढे भयंकर घडलं

लासलगाव नाशिकमध्ये ही फसवणुकीचा गुन्हा, जामनेरमधील माजी नगरसेवकाची फसवणूक

जामनेर येथील माजी नगराध्यक्षाच्या चुलत भावाचे श्रीरामपूर येथील मुलीसोबत विवाह झाल्यानंतर लग्नाच्या अवघ्या महिन्याभरात मुलगी आईसोबत निघून गेली आणि त्यानंतर मुलीच्या आईने माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्याविरुद्ध  मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मात्र हा गुन्हा मागे घेण्यासाठी मुलीच्या आईने पारस ललवाणी यांच्याकडे 25 लाखाच्या खंडणीची मागणी केली होती आणि खंडणीची रक्कम लासलगाव येथील एका लॉजमध्ये देण्याचे ठरले. मात्र याबाबत पारस ललवाणी यांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी सापळा रचून खंडणीची काही रक्कम स्वीकारताना महिलेला रंगेहाथ पकडून महिलेविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. या महिलेसोबत प्रफुल्ल लोढावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

विधिमंडळात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पेन ड्राईव्ह सादर करत नाशिक हनी ट्रॅपमध्ये सुमारे 72 जण अडकल्याचा आरोप केला असून यात काही अधिकारी व लोकप्रतिनिधींचा समावेश असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सध्या राज्यात हनी ट्रॅपचे प्रकरणाची चर्चा सुरू असताना जळगाव मधील प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅप प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाशी याचा काही संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हनी ट्रॅप प्रकरणाची पाळमुळं जळगावपर्यंत पसरली असल्याचे बोलले जात आहे.


 

Topics mentioned in this article