Jalgaon News: अनैतिक संबंध,धमकी अन् जीवाची बाजी! अखेर 'त्या' तरुणासोबत जे घडलं त्याने अंगाचा थरकाप उडेल

या वादातून सागर याला धमकी देण्यात आली होती. महिलेचा नाद सोड नाही तर जीव जाईल अशी धमकी त्याला देण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • जळगाव जिल्ह्यातील निमखेडी शिवारात विवाहीत तरुण सागर सोनवणे याची निर्घृण हत्या करण्यात आली होती
  • सागरचा अनैतिक संबंध एका विवाहीत महिलेसोबत काही वर्षांपासून होते.
  • अनिल नन्नवरे आणि संदीप बाविस्कर यांना सागरला धमक्या दिल्या होत्या.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
जळगाव:

मंगेश जोशी 

अनैतिक संबंध अनेक वेळा जीवावर उठतात. वेळीच असा संबंधातून बाजूला होणे किंवा असे संबंध टाळणे हे प्रत्येक कुटुंबासाठी चांगले ठरते. पण अनेक जण या अनैतिनक संबंधातून बाहेर येत नाहीत. उलट ते गुरफटत जातात. ते इतके गुरफटतात की शेवटी त्यात त्यांचाच शेवट होतो. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. विवाहीत असतानाही एका तरुणाने एका विवाहीत महिले सोबत संबंध ठेवले होते. तो कोणत्याही स्थिती तिला सोडण्याच्या तयारीत नव्हता. शेवटी त्याला या संबंधातून हे जगच सोडावे लागले. या घटनेनं सर्वच जण हादरले आहेत. 

जळगाव शहरालगत असलेल्या निमखेडी शिवारात सागर साहेबराव सोनवणे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री घडली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी तपासचक्र फिरवीत एका संशयित आरोपीला अटक केली असून अनैतिक संबंधातून सागरचा खून झाल्याचे उघड झाले आहे. सागर सोनवणे याचे परिसरातील एका महिलेसोबत गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंध होते. याच कारणावरून अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे व संदीप छगन बाविस्कर यांच्यासोबत त्याचा वारंवार वाद होत होता. 

नक्की वाचा - Amitabh Rekha: अमिताभ-रेखा यांच्या नात्याचं अखेर कोडं उलगडलं, जवळच्या मैत्रीणीनं सत्य समोर आणलं

या वादातून सागर याला धमकी देण्यात आली होती. महिलेचा नाद सोड नाही तर जीव जाईल अशी धमकी त्याला देण्यात आली होती. पण सागरने ही धमकी गांभिर्याने घेतली नाही. रविवारी सायंकाळी धमकी दिल्यानंतर रात्री 10 वाजता निमखेडीतील राम मंदिर परिसरात आरोपींनी सागरवर लोखंडी धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत सागरला जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

नक्की वाचा - Shocking : 'बाबा बाथरुममधून आले आणि एकापाठोपाठ 5 जणांना लटकवलं', 6 वर्षांच्या मुलानं सांगितला खतरनाक प्रसंग

सागर साहेबराव सोनवणे हा त्या विवाहीत महिलेच्या नादाला लागला होता. हे काही लोकांना खटकत होते. त्यावरून गावात नियमित वाद ही होत होते. याबाबत सागरला समज देवूनही त्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते. पण हे प्रकरण आपल्या जीवावर उटेल असं त्याने कधी स्वप्नातही विचार केला नसले. तो गाफील राहीला. त्याचाच फायदा घेत त्याला मंदिरात भेटण्यासाठी बोलावण्यात आलं. तो मंदिरात आल्यानंतर त्याच्या डोक्यावर  मारेकऱ्यांनी अतिशय वाईट पद्धतीने वार केले. त्याचे डोकं अक्षरश: ठेचण्यात आलं. त्यानंतर त्याला त्याच अवस्थेत फेकून देण्यात आले. 

Advertisement