- अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील नात्यावर अनेक चर्चांनंतरही कधीही स्पष्टता समोर आलेली नाही
- डिझायनर बीना रमानी यांनी रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याबाबत महत्त्वपूर्ण खुलासे एका मुलाखतीत केले आहेत
- बीना म्हणाल्या की, राजकीय कारणांमुळे अमिताभ बच्चन सार्वजनिकरित्या रेखा यांच्याशी नाते स्वीकारू शकले नाहीत
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्याबाबत अनेक वेळा अनेक चर्चा केल्या गेल्या. त्यांच्या नात्याला वेगवेगळे अँगल ही दिले गेले. पण सत्या काय होतं हे कधीच समोर येवू शकलं नाही. होत्या त्या फक्त चर्चा. शिवाय कधी अमिताभ किंवा रेखा यांनी ही पुढे येवून आपल्या नात्याबाबत कधीच कुठला खुलासा केला नाही. त्यामुळे या दोघांच्या नात्यातलं कोडं कधीच कोणाला सोडवता आलं नाही. त्यांचे चाहते गेले कित्येक वर्ष हे कोड सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यात कुणालाही आतापर्यंत यश आलं नाही. पण आता रेखा यांची जवळचीच मैत्रीण पुढे आली आहे. तीने सत्य काय आहे हे सांगून बॉलिवूड जगतात एकच खळबळ उडवून दिली आहे.
डिझायनर बीना रमानी हे नाव बॉलिवूडमध्ये नेहमी चर्चेत असतं. त्या अभिनेत्री रेखा यांच्या जवळच्या मैत्रीण आहेत. त्यांनी रेखा आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या कथित नात्याबद्दल अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी नुकत्याच एका मुलाखतीत उघड केल्या आहेत. रेखा आणि अमिताभ यांनी 'सिलसिला'सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ऑन-स्क्रीन त्यांची केमिस्ट्री जबरदस्त हिट झाली होती. बीना रमानी यांनी आठवण करून दिली की, रेखा यांना मनापासून वाटत होते की, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ऑफ-स्क्रीन नात्याला सार्वजनिकरित्या स्वीकारावे.
मात्र, त्या वेळी अमिताभ बच्चन यांचे लग्न जया बच्चन यांच्यासोबत झाले होते. बीना यांच्या दाव्यानुसार, अमिताभ बच्चन यांच्या राजकीय (Political) कारकिर्दीमुळेच ते हे नाते सार्वजनिकरित्या स्वीकारू शकले नाहीत. बीना रमानी यांनी ANI शी बोलताना हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. बीना यांनी रेखा यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. सुपरस्टार वडील जेमिनी गणेशन यांच्यासोबतच्या नात्याचा रेखा यांच्यावर खोल परिणाम झाला होता.
कारण, रेखा यांचा जन्म त्यांच्या लग्नाशिवाय झाला होता. बीना म्हणाल्या, "रेखा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या एका लहान मुलासारख्या निरागस आहेत. त्यांनी आयुष्यात काही नासमज चुका केल्या असतील, तर त्या केवळ त्यांच्या निश्पाप (Innocence) स्वभावा मुळे आहेत असं त्या म्हणाल्या. बीना यांच्या मते, रेखा यांना आई-वडिलांकडून खूप प्रेमाची गरज होती. जी त्यांना मिळाली नाही. केवळ 13-14 वर्षांच्या कोवळ्या वयात त्यांनी काम सुरू केले आणि त्या आपले बालपण जगू शकल्या नाहीत. असं ही त्यांनी या मुलखतीत सांगितलं.
बीना रमानी रेखा यांना भेटल्या. तेव्हा रेखा यांचे संपूर्ण जग अमिताभ यांच्याभोवती फिरत होते. ते दोघे आत्मिकरित्या जोडले गेले होते. पण अमिताभ बच्चन राजकारणात उतरल्यानंतर हे नाते सार्वजनिकरित्या पुढे जाऊ शकले नाही. त्या कठीण काळात रेखा खूप त्रास सहन करत होत्या. नंतर त्यांनी मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले, पण ते नातेही फार काळ टिकले नाही. बीना यांच्या या मुलाखतीनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. शिवाय या नात्यावरचा पडदा ही त्यांना काढला आहे. त्यामुळे आता रेखा आणि बच्चन यांच्याकडून यावर काही प्रतिक्रीया येते का हे पाहावे लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world