Jalna Crime: क्रूरतेची हद्द ओलांडली, जुन्या वादातून घडलं भयंकर; 'त्या' घटनेनं जालना जिल्हा हादरला

Jalna News: कैलास बोराडे अस या घटनेत जखमी असलेल्या व्यक्तीचे नाव आहे.  गंभीर जखमी असल्याने या बोराडे यांच्यावर आण्वा या गावात प्राथमिक उपचार केले.

जाहिरात
Read Time: 2 mins

मोसीन शेख, जालना: जुन्या व्यक्तिगत वादातून एकाला मारहाण करत विवस्त्र करून पेटत्या चुलीमध्ये एक मोठा लोखंडी रॉड टाकुन तापलेला लालबुंद लोखंडी रॉडने गुप्तांगावर तसेच शरीरावर चटके दिल्याची धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातील आण्वा गावात घडली आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणाला विवस्त्र करुन त्याच्या गुप्तांगासह शरीरावर लोखंडी रॉडने चटके दिल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. कैलास बोराडे अस या घटनेत जखमी असलेल्या व्यक्तीचे नाव आहे.  गंभीर जखमी असल्याने या बोराडे यांच्यावर आण्वा या गावात प्राथमिक उपचार केले.

(नक्की वाचा- Swargate Case: ...तर 'ती' वासनेचा बळी झाली नसती! स्वारगेट स्थानकात सुरु होते 'हे' काळे धंदे; वाचा स्फोटक रिपोर्ट)

त्यानंतर त्याला भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.या प्रकरणी पारध पोलिस ठाण्यात दोन आरोपी विरुद्ध गुप्त अंगाला चटके देवुन जिवे ठार  मारण्याचा प्रयन्त केल्या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेतील आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध आता पोलिसांनी सुरू केला आहे. 

Topics mentioned in this article