Jalna Crime: चार दिवसांपासून बेपत्ता, आता थेट मृतदेह सापडला; जालन्यात खळबळ

अमोलच्या हत्या करणाऱ्या संशयित आरोपीना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना: गेल्या चार दिवसापासून गायब असलेल्या तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यामध्ये घडला आहे. जालना जिल्ह्यातील  घनसावंगी तालुक्यातील देवळी तांडा येथील घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. ता तरुणाची हत्या करून मृतदेह रुग्णालयात दाखल केल्याचा आरोप करत संशयित आरोपीना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसापासून गायब असलेल्या तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घनसावंगी तालुक्यातील देवळी तांडा गावात ही घटना घडली. जालन्यातील मानेगाव वाडी तांडा गावातील 27 वर्षीय अमोल किसन राठोड  हा तरुण गेल्या चार दिवसापासून गायब होता. आज (ता. 27 मे) त्याचा मृतदेह घनसावंगी तालुक्यातील देवळी वाडी तांडा गावातील विहिरीजवळ संशस्पद अवस्थेत आढळून आला.

याप्रकरणी मृत तरुणाच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.  काही संशयित नातेवाईकांनी त्याला बोलावून त्याची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत अमोलच्या हत्या करणाऱ्या संशयित आरोपीना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली आहे.

नक्की वाचा - Mumbai Metro 3 : मुंबईच्या भूमिगत मेट्रो 3 मध्ये अक्षरश: तळं; पण इतकं पाणी आलं कुठून? प्रशासनानेच सांगितलं कारण

Advertisement

या घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलिसांनी मृत्यूदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिंदे गटाच्या आमदार अर्जुन खोतकर यांच्या सह उभाटा गटाचे भास्कर आंबेकर यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राठोड कुटुंबियांची भेट घेत या प्रकरणी अधिक तपास करण्याची मागणी घनसावंगी पोलिसांकडे केली आहे. 

Topics mentioned in this article