बाप आणि लेकीचं नात हे पवित्र नातं आहे. या नात्याला कलंक लावणारी घटना जालन्यात घडली आहे. इथं एका बापानं आपल्या पोटच्या लेकीवरच अत्याचार केले. ती चौदा वर्षाची आहे. या नराधमाने तिला अश्लील व्हिडीओ दाखवत हे कृत्य केले. जालना शहरातील मोढा परिसरातील हिंदनगरात भागात ही घटना घडली. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर तातडीने पोलीसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शहरातील नवीन मोंढा परिसरात ही पिडीत मुलगी आपल्या कुटुंबा बरोबर राहाते. पिडीत मुलीच्या नराधम बापाने पंधरा दिवसापूर्वी हे भयंकर कृत्य केले. त्यावेळी त्याची पत्नी घरी नव्हती. त्यावेळी त्याने ही संधी साधत आपल्या चौदा वर्षीय मुलीला मोबाईलवरील अश्लील व्हिडीओ दाखवले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक आत्याचार केले. त्यानंतर तिला धमकी ही दिली. या गोष्टीची वाच्यता करू नको. या धमकीमुळे ती मुलगी प्रचंड घाबरली होती. तीने या बाबत कुणालाही काही सांगितले नाही.
तिने भितीपोटी गप्प राहाणे पसंत केले. काही दिवस त्यात निघून गेले. पण दोन दिवसा पूर्वी घरात कुणीच नव्हते. पत्नी कामा निमित्त घरा बाहेर गेली होती. हीच संधी साधत या नराधमाने पुन्हा एकदा मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा उचलला. परत त्याने मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवले. त्यानंतर तिच्यापर परत एकदा आत्याचार केले. या घटनेनं ती मुलगी हादरून गेली. यावेळी ही तिला धमकी देण्यात आली होती. पण या वेळी तिने या विरोधात आवाज उचलण्याचा निर्णय घेतला होता.
संध्याकाळी आई घरी येण्याची ती वाट पाहात होती. आई घरी आल्यानंतर पिडीत मुलीने झालेली सर्व घटना सांगितली. वडीलांनीच आपल्याबरोबर चुकीची गोष्ट केल्याचे तिने सांगितलं. हे ऐकून तिच्या आईच्या पाया खालची वाळू सरकली. त्यानंतर मुलीने आईसोबत पोलीस स्टेशन गाठले. चंदणझीर पोलिस ठाण्यात तिने आपल्याच नराधम बापा विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार मिळताच या जन्मदात्या नराधम बापाला बेड्या ठोकल्या.
या नराधम बापा विरुद्ध स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपकडून मोबाईल ही जप्त केला आहे. तो मोबाईल तपासला असता त्यात त्यांना अश्लील व्हिडीओ आढळून आले आहेत. याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे. ही घटना समोर आल्यानंतर जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे.