निलेश बंगाले, वर्धा: पतीने मारहाण केल्याच्या रागातून महिलेने दीड वर्षाच्या चिमुकलीला सोबत घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यामधून समोर आली आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट येथे घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत तपासाला सुरुवात केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेतात चरत असलेल्या मेंढ्यांना परत आणण्यास पतीने सांगितले मात्र पत्नीने नकार दिल्याने संतापलेल्या पतीने विवाहितेला मारहाण केली. याच रागातून संतप्त विवाहितेने पोटच्या दीड वर्षाच्या चिमुकलीला सोबत घेत लगतच्या शेतातीलच विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याच्या फुकटा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. ही खळबळजनक घटना हिंगणघाट तालुक्याच्या फुकटा गावात घडली. शशिकला पिंटू घुले (24 रा. परसोडी जि. यवतमाळ), कविता पिंटू घुले (1.5) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विवाहित महिला आपल्या मुलीसोबत विहिरीत उडी मारताना तेथील काही नागरिकांना दिसली. त्यांनी तत्काळ इतरांना गोळा करत माय लेकीचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. मृत विवाहितेच्या घरातील नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी कुठलीही तक्रार नसल्याचे सांगितले. दोघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपासाला सुरवात केली आहे.
दुसरीकडे, घरगुती वादातून विवाहित महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांची गळा दाबून हत्या केल्याचीही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडली. यावेळी महिलेने आपल्या पतीवरही कोयत्याने हल्ला केला. शंभू दुर्योधन मिढे (वय 1 वर्ष) आणि पियू दुर्योधन मिढे (वय ०3 वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. तर कोमल दुर्योधन मिंढे (वय, 30) असे या हत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून तिला पोलिसांनी अटक केली आहे.
Maharashtra Politics: 'जयंत पाटील नीच अन् कपटी, त्यांचा कार्यक्रम...' कुणी केली जहरी टीका?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world