जावयाची हत्या अन् अपघाताचा बनाव, बायकोसह सासरच्यांनी रचला भयंकर कट; जालन्यात खळबळ

दत्ता विष्णू थोरात यांचा त्यांच्याच सासऱ्यानेच अपघाताचा बनाव करून खून केल्याची घटना समोर आले आहे. याप्रकरणी सासऱ्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना: अंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव गावात बायको आणि मुलासह राहणाऱ्या दत्ता विष्णू थोरात यांचा त्यांच्याच सासऱ्यानेच अपघाताचा बनाव करून खून केल्याची घटना घडल्याचं अंबड पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी सासऱ्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव गावातील दत्ता विष्णू थोरात आणि पत्नी वर्षा दत्ता थोरात यांच्यांमध्ये वाद होत होते. त्यामुळे पत्नी सासरी नांदत नसल्याने तो बायको व मुलांसह अंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव येथे सासऱ्याच्या शेतात गेल्या ७ महिन्यापासून राहत होता.  चार दिवसापूर्वी त्याच्या सासऱ्याने आणि साल्याने दत्ता याचा अपघात झाल्याचे सांगून त्याचा मृतदेह अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणला. 

नक्की वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी घडामोड? सगळ्यांच्या नजरा शरद पवारांवर

यावेळी दत्ता यांच्या अंगावरील मारहाणीच्या जखमा व वळ पाहून हॉस्पिटल मध्ये असलेल्या डॉक्टरांनी घटनेची माहिती  एमएलसीद्वारे अंबड पोलिसांना दिली. अंबड पोलिसांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये जाऊन मयत दत्ता थोरात यांच्या नातेवाईकांना कळवून त्यांच्या उपस्थितीत काल रात्री उशिराने मयताचे शवविच्छेदन केले तसेच  अंबड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली.

या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असता मयत दत्ता थोरात याचा भाऊ प्रदीप विष्णू थोरात याने दत्ताची पत्नी वर्षा,  सासरे बळीराम किसन गायकवाड, सासू मेहुणा गोरख बळीराम गायकवाड व संदीप बळीराम गायकवाड  यांनीच खून केल्याचा संशय व्यक्त केला.   त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करताच पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरु केला.

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यावेळी दत्ता थोरात यांचा त्यांच्या सासू सासरे, साला व पत्नीने मारहाण केल्याने मृत्यु झाल्याची बाब समोर येताच अंबड पोलिसांनी दत्ताची पत्नी वर्षा, सासरे बळीराम किसन गायकवाड, सासू मेहुणा गोरख बळीराम गायकवाड व संदीप बळीराम गायकवाड यांच्या विरुद्ध अंबड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास अंबड पोलीस करत आहे.

नक्की वाचा: राज्य मंत्रिमंडळ विस्तार : भाजपाचा सल्ला शिंदेंनी मानला ! 'त्या' 4 जणांना वगळणार, पाहा संभाव्य यादी