मोबाइल... इन्स्टाग्राम...मैत्री... अन् आयुष्याचा शेवट; जालन्यातील अकरावीच्या विद्यार्थिनीसोबत काय घडलं? 

जालन्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
जालना:

सोशल मीडियावर वावरताना डोळे बंद करून समोरच्यावर विश्वास ठेवणं जीवघेणं ठरू शकतं. सध्या सोशल मीडियाचा अपेक्षेपेक्षा जास्त वापर केला जातो. त्यामागील साध्य लक्षात न घेता सोशल मीडियावर एकमेकांना न भेटता मैत्रीही केली जाते. मात्र केवळ प्रोफाइलवरील ओळखीतून कोणालावरही विश्वास ठेवताना थोडं थांबून विचार करणं आवश्यक आहे. अन्यथा हाच प्रकार जीवघेणा ठरू शकतो. जालन्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

नक्की वाचा - Kurla Bus Accident : आफरीनच्या पहिल्या नोकरीचा पहिला दिवस ठरला शेवटचा, रस्त्यावरुन चालणं ही चूक होती का?

जालन्यातील अंबड शहरातील मत्स्योदरी कला वाणिकज्य विज्ञान महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीने छेडछाडीला कंटाळून राहत्या घरी ओढणीने पंख्याला गळफास लावून टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. भाग्यश्री उर्फ चिऊ सुरेश घाडगे असं विद्यार्थिनीचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांच्या मदतीने घटनास्थळी पंचनामा करून शव विच्छेदन करण्यासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मात्र विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाईकांनी या प्रकरणी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान सुरेश घाडगे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयितांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. तरुणीला फोनच्या माध्यमातून धमकी व छेडछाड करण्यात येत असल्याची माहिती ही समोर आली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - ​​​​​​​लग्नाची पत्रिका नव्हे, धोक्याची घंटा! लिंकवर क्लिक करताच फोनचा ताबा जातो गुन्हेगारांकडे!

आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणीने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. याशिवाय या प्रकाराबाबत तिने व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवल्याचीही माहिती आहे. आरोपी तरुण आणि मृत तरुणीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीतून हा तरुण तिला ब्लकमेल आणि छेडछाड करीत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सोहम मिंधर या तरुणाला अटक करण्यात आली असून अंबड पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.