लक्ष्मण सोळूंके, प्रतिनिधी
Jalna Crime News : सामान्य नागरिकांचं संरक्षण करण्याची ज्याच्यावर जबाबदारी असते तो पोलीस खात्यातील कर्मचारीच भक्षक बनल्याचा प्रकार जालन्यात घडला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यानं 24 वर्षाच्या तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यानं पीडित तरुणीला जालन्यातील पोलीस दलाच्या शासकीय निवासस्थानी बोलावून सतत दोन महिने शारीरिक अत्याचार केल्याची माहिती उघड झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
संदीप वसंत सोनावणे (वय 28) असं या प्रकरणातील आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. सोनावणेनं पीडित तरुणीला 9 ऑक्टोबर 2024 ते 2 डिसेंबर 2024 या कालावधीत पोलिसांच्या निवासस्थानी बोलावले. ही तरुणी छत्रपती संभाजीनगरमध्ये नर्सिंगचं शिक्षण घेत आहे. त्यानं तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर सोनावणेनं तरुणीला दिलेलं लग्नाचं वचन न पाळता दुसऱ्याच तरुणीसोबत लग्न ठरवलं. या प्रकारची माहिती मिळताच पीडित तरुणीनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.
( नक्की वाचा : Reel Star मुलाची हत्या करत माजी सैनिकानं उचललं टोकाचं पाऊल! जळगाव हादरलं )
तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कर्मचारी संदीप सोनावणेवर गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात स्वारगेट बस स्थानकात झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यापाठोपाठ जालना पोलिसांच्या निवासस्थानात हा प्रकार घडला. पोलीस प्रशासनानं या प्रकरणात कमालीची गुप्तता पाळत पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकातही याबाबतची माहिती देणं टाळलं आहे.