जाहिरात

Reel Star मुलाची हत्या करत माजी सैनिकानं उचललं टोकाचं पाऊल! जळगाव हादरलं

रील स्टार असलेल्या मुलाची हत्या त्याच्या वडिलांनीच केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला आहे.

Reel Star मुलाची हत्या करत माजी सैनिकानं उचललं टोकाचं पाऊल! जळगाव हादरलं
जळगाव:

मंगेश जोशी, प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यात रील स्टार असलेल्या मुलाची हत्या करत माजी सैनिक असलेल्या पित्याने आत्महत्या  केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माजी सैनिक असलेल्या पित्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट मध्ये आपल्या मुलाची आपण हत्या केल्याची कबुली दिली आहे. 

काय आहे प्रकरण?

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव-एरंडोल तालुक्यातला हा धक्कादायक प्रकार आहे. यामध्ये बापाने आत्महत्या करत सुसाईड नोटमध्ये रील स्टार मुलाचा हत्या करून त्याचा मृतदेह धरणात पुरला असल्याची कबुली सुसाईड नोट मध्ये दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

प्रसिद्ध रील स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील (वय 22, रा. भोरखेडा), असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर,  विठ्ठल सखाराम पाटील असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. 

विकी पाटीलचे वडील विठ्ठल सखाराम पाटील हे माजी सैनिक होते. त्यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये "माझ्या मुलाचा खून केला असून, त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आला आहे," असे लिहिले होते. ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

( नक्की वाचा : Kalyan :इमारत अनधिकृत घोषित झाल्यानंतरही केली करवसूली, आता चालवला हातोडा! 28 कुटुंब पुढं काय करणार? )

धरणाजवळ मृतदेह सापडला

सुसाईड नोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता, गुरुवारी दुपारी भोरखेडा गावाजवळील धरण परिसरात विकी पाटीलचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढला. यावेळी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्याचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान विठ्ठल पाटील यांनी मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या का केली?याचं कारण मात्र, अद्याप गुलदस्त्यात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: