Shocking News : 4 मावश्यांनी मिळून 16 दिवसांच्या भाच्याचा जीव घेतला, वडिलांनी सांगितलं संतापजनक कारण

Shocking News :  4 मावश्यांनी मिळून त्यांच्या 16 दिवसांच्या निष्पाप भाच्याची क्रूरपणे हत्या केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Shocking News : या हत्येचं कारणही तितकंच धक्कादायक आहे.
मुंबई:

Shocking News :  'माय मरो पण मावशी जगो', ही म्हण आपल्या सर्वांना माहिती आहे. भाचे ही मावशीसाठी जीव की प्राण असतात. भाच्याचं कौतुक करण्यात, त्यांची काळजी घेण्यात त्यांना घडवण्यात मावशीचं मोठं योगदान असतं. पण, या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक आणि संतापजनक गोष्ट उघड झाली आहे. 4 मावश्यांनी मिळून त्यांच्या 16 दिवसांच्या निष्पाप भाच्याची क्रूरपणे हत्या केली आहे. राजस्थानमधील जोधपूर शहरात हा संतापजनक प्रकार घडला. या हत्येचं कारणही तितकंच धक्कादायक आहे.

काय आहे कारण?

जोधपूर कमिशनरेटच्या एअरफोर्स पोलीस ठाणे (Airforce Police Station) हद्दीतील पाच बत्ती परिसरातील नेहरू कॉलनी (Nehru Colony) येथे ही भीषण घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकून या मावश्यांनी ही अमानवीय कृत्य केले. या मावश्यांचा विवाह होत नसल्यामुळे त्यांनी या निष्पाप बाळाला 'बळी' म्हणून पायदळी तुडवून मारले, असा पीडित बाळाच्या वडिलांचा आरोप आहे. या हत्येमागे तांत्रिक क्रिया आणि बळी देण्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

( नक्की वाचा : Raigad News : 'आई कुठे आहेस तू?' हाक मारली अन् 4 वर्षांची मुलगी बेपत्ता, 48 तासानंतर मोठा ट्विस्ट )

या घटनेच्या वेळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला बाळाला मांडीवर घेऊन बसलेली दिसत आहे आणि काहीतरी उच्चारण करताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूला असलेल्या इतर महिलाही काहीतरी मंत्रोच्चार करत आहेत. हे सर्वजण लोकदेवता 'भैरू' (Bhairu) याचे आवाहन करत असल्याचा संशय आहे, ज्यामुळे या ठिकाणी 'तांत्रिक क्रिया'  सुरू होत्या असे भासत आहे.

वडिलांनी केली कठोर शिक्षेची मागणी

मृत्यू झालेल्या १६ दिवसांच्या बाळाच्या वडिलांनी त्यांच्या मेव्हण्यांवर (पत्नीच्या बहिणींवर/मावश्यांवर) गंभीर आरोप केले आहेत. त्यांचं  लग्न होत नसल्याने त्यांनी हा क्रूर गुन्हा केल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी आपल्या निष्पाप मुलाच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच, कायद्यापासून वाचण्यासाठी त्या या प्रकारचे व्हिडीओ तयार करून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

सध्या जोधपूर एअरपोर्ट पोलीस ठाण्याचे अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलीस अधिकारी या प्रकरणी मौन बाळगून असले तरी, पीडित कुटुंबीयांनी आपल्या बाळाला न्याय मिळवून देण्यासाठी दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली आहे.
 

Topics mentioned in this article