जाहिरात

Rana Balachauria Murder: 'सिद्दू मुसेवालाच्या हत्येचा बदला', कबड्डीपटू राणा बालचौरियाला गोळ्या झाडून संपवलं

उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राणा बालचौरियाच्या हत्येची जबाबदारी बंबीहा टोळीने घेतली आहे.

Rana Balachauria Murder: 'सिद्दू मुसेवालाच्या हत्येचा बदला', कबड्डीपटू राणा बालचौरियाला गोळ्या झाडून संपवलं

 Mohali Firing News: पंजाबमधील मोहाली येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका कबड्डी स्पर्धेत जोरदार गोळीबार झाला असून स्पर्धेच्या प्रमोटरची हत्या करण्यात आली. राणा बालचौरिया असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.  कबड्डीपटू राणा बालचौरिया हा सोहानामध्ये सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेचा प्रमोटर देखील होता. त्याला उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राणा बालचौरियाच्या हत्येची जबाबदारी बंबीहा टोळीने घेतली आहे.

Latur News: पैशाची हाव, हत्येचा बनाव! एक चुक नडली अन् भयंकर षडयंत्राचा पर्दाफाश

कबड्डीपटूची हत्या

राणा बालचौरियाच्या हत्येची जबाबदारी बंबीहा टोळीने स्वीकारली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे.  "माझ्या सर्व हिरोंना सतश्रीयाकाल. राणा बालचौरियाची आज मोहाली सोहाना साहिब कबड्डी कपमध्ये हत्या करण्यात आली. मी याची जबाबदारी घेतो."डोनी बाल, शगुन प्रीत मोहब्बत रंधावा, अमर खेवा प्रभदासवाल आणि कौशल चौधरी, या माणसाने आमच्या विरोधात जग्गु खोती आणि लॉरेन्स यांचा वापर केला.

बंबीहा टोळीने घेतली जबाबदारी

बंबीहा टोळीने त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, "त्याने सिद्धू मूसेवालाच्या मारेकऱ्यांना आश्रय दिला आणि स्वतः त्या लोकांची काळजी घेतली. आज, आम्ही राणाला मारून मूसेवालाच्या हत्येचा बदला घेतला. हे कृत्य आमच्या पारा मखन अमृतसर आणि डिफॉल्टर करणने केले. आजपासून, मी सर्व खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना विनंती करतो की जग्गू खोती आणि हॅरी टॉटच्या संघात खेळू नका; त्याचे परिणाम असेच होतील. आम्हाला कबड्डीवर आक्षेप नाही. आम्हाला खोती आणि हॅरी टॉटच्या कबड्डीमध्ये कोणताही हस्तक्षेप नको आहे.

नक्की वाचा - Latur News: भयंकर कांड! तरुणाला आधी पोत्यात भरलं, मग गाडीत टाकलं, कारला आग लावून जिवंत जाळलं

गोळीबाराच्या घटनेत मारला गेलेला व्यक्ती राणा बालचौरिया हा कबड्डी खेळाडू तसेच स्पर्धेचा प्रमोटर होता. त्याचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. स्थानिकांनी सांगितले की स्पर्धेदरम्यान काही लोकांनी सेल्फी काढण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे जाऊन गोळी झाडली. मोहाली एसएसपी हरमनदीप सिंग हंस यांनी घटनेची पुष्टी केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com