Nashik News : नाशिक हादरलं! जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा नाल्यात सापडला मृतदेह

गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता झालेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास किसन चौधरी यांचा मृतदेह पळसे पंपिंग रोडवरील एका नाल्याच्या पुलाखाली आढळून आल्याने खळबळ उडाली.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल वाघ, प्रतिनिधी

Nashik News : गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता झालेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास किसन चौधरी यांचा मृतदेह पळसे पंपिंग रोडवरील पुलाखालील एका नाल्यात गुरुवारी दुपारी आढळून आला. राहत्या घरातून अचानकपणे बेपत्ता असलेले चौधरी यांचा त्यांच्या कुटुंबीयांकडून सर्वत्र शोध घेतला जात होता. मात्र ते सापडले नाही.

याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. दरम्यान, पळसे राजवाडा नाल्यावरील पुलाखाली गुरुवारी दुपारी चौधरी यांचा कुजलेल्या अवस्थेत पाण्यात मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी तत्काळ सदर घटनेची माहिती नाशिकरोड पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

नक्की वाचा - Teacher's death : अंडी खात असताना जागीच कोसळले, शिक्षकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वजण हैराण!

नेमकं काय घडलं?

नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास किसन चौधरी एका आठवड्यापासून बेपत्ता होते. कुटुंबीयांकडून नाशिक रोड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.पोलिसांच्या तपासानंतर काल १८ डिसेंबरच्या सायंकाळी कैलास चौधरी यांचा मृतदेह पळसे येथील पुलाखालील नाल्यात आढळून आला. घटनेनंतर नाशिक पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिकचा तपास नाशिक रोड पोलिसांकडून सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या काळात जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. 

Advertisement