विद्यार्थी आणि शिक्षिका चिडवत होत्या म्हणून कल्याणच्या मुलानं दिला जीव! चिठ्ठीत काय लिहिलं?

कल्याणमधील 13 वर्षांच्या विद्यार्थ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन जीव दिला आहे. त्यानं मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर आलंय.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
कल्याण:

अमजद खान, प्रतिनिधी

कल्याणमधील 13 वर्षांच्या विद्यार्थ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन जीव दिला आहे. त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून सर्वांनाचा धक्का बसलाय. काही दिवसापूर्वी शाळेच्या संचालकाकडून झालेल्या छळामुळे एका १७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. आत्ता आणखी एका मुलाने आत्महत्या केल्याने कल्याणमध्ये एकच हळहळ व्यक्त होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात एक नामांकित शाळा आहे.  या शाळेत आठवीमध्ये विघ्नेश पात्रा शिकत होता. विघ्नेशनं रविवारी संध्याकाळी त्याचे वडील प्रमोद कुमार कामागावर गेले होते. आई आणि बहीण कामानिमित्त घराबाहेर गेली होती. त्याच दरम्यान ही घटना घडली. 

प्रमोद कुमार घरी परतल्यानंतर त्यांना विघ्नेशनं गळफास घेतल्याचं दिसलं. मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर आजूबाजूचे लोकं घरात जमा झाले. कोळसेवाडी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन विघ्नेशचा मृतदेह खाली उतरवून पोस्टमार्टमसाठी पाठविला. विघ्नेशजवळ एक सुसाईड नोट होती.

( ट्र्ेंडिंग बातमी - तो गुजराती, ती चीनी दोघांनी मिळून केलं मोठं कांड, संपूर्ण अमेरिकेत खळबळ! )

वडिलांनी मोठया बहिणीवर रागावू नये. माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. शाळेतील दिपिका नावाची शिक्षिका आणि एक मुलगा त्याला चिडवित होते. त्यामुळे विघ्नेशवर खूप दबाव होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा या चिठ्ठीचा आशय आहे.

Advertisement

या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी एडीआर दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुुरु केला आहे. तक्रार प्राप्त झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं. या घटनेची माहिती समजताच  कल्याण काँग्रेस पक्षाच्या महिलाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी पोलिसांची भेट घेतली. त्यांना एक निवेदन दिले.  निष्पाप विघ्नेशला मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकेच्या विरोधात पोलिसांनी ठोस कारवाई केली पाहिजे. त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. आणखीन काही मुलांना अशी वागणूक दिली गेली आहे का ? याचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health    9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall    022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Advertisement
Topics mentioned in this article