अमजद खान, प्रतिनिधी
कल्याणमधल्या लक्ष्मी मार्केटमध्ये दोन दिवसांपूर्वी बारकू मढवी या शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणामध्ये कल्याणच्या महात्मा फुले पोलिसानी धक्कादायक खुलासा केला आहे. बारकू मढवी यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा सख्खा भाऊ कृष्णा मढवी आहे. वडिलोपार्जित संपतीत बारकू हा कृष्णाला हिस्सा देत नसल्याच्या रागातून कृष्णाने हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
दोन दिवसापूर्वी कल्याणच्या लक्ष्मी मार्केटमध्ये पहाटे सहा वाजता गायबैलांकरीता चारा घेण्यासाठी बारकू मढवी आले होते. ते मार्केटमध्ये चारा घेत असताना त्यांच्या मागून आलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर काेयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात बारकू गंभीररित्या जखमी झाले. मात्र हल्लेखोराला वाटले की, बारकू हा मेल्यात जमा आहे. हल्ला करुन हल्लेखोर पसार झाला होता.
बारकू यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. या प्रकरणी महात्मा फुले पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बारकू मढवी याच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास सुरु केला. तपासासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला असता सीसीटीव्हीत बारकूवर हल्ला करणारा हल्लेखोर दिसत होता.
( नक्की वाचा : धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मांना का सोडलं? मुलानं केला खळबळजनक खुलासा )
बारकू यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. या प्रकरणी महात्मा फुले पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बारकू मढवी याच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास सुरु केला. तपासासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला असता सीसीटीव्हीत बारकूवर हल्ला करणारा हल्लेखोर दिसत होता. मात्र हल्लेखोराने टोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क घातला होता. त्यामुळे सीसीटीव्हीत दिसणारा हल्लेखोर नेमका कोण असा प्रश्न उपस्थित झाला. या प्रकरणात महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी विकास मडके यांनी तपासाची चक्रे फिरवली.
अखेरीस पोलिसांनी हल्लेखोलाला पकडले. हल्लेखोराला पकडल्यावर पोलिसांसमोर आलेली माहिती अतिशय धक्कादायक होती. बारकू मढवी हा त्याचा भाऊ कृष्णा मढवीयाला वडिलोपार्जीत जमीनीत हिस्सा देत नव्हता. जमिनीवर स्वतःच्या बंगला बांधले, बाजूच्या जागेवर एका खासगी कंपनीच्या टॉवरचे पैसे तो स्वतः घेतो आणि एका दुसऱ्या जमिनीवर त्यांनी बांधकाम सुरू केले आहे. त्याचे पैसे देखील तो भावाला देत नाही या गोष्टीचा राग कृष्णा याच्या मनात होता. त्याना या रागातून कृष्णाने बारकूवर कोयत्याने हल्ला करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्यात बारकू जखमी झाला असला तरी तो त्यातून बचावला. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.