Kalyan Crime: निवृत्त पोलिसाचा सोसायटीत धुमाकूळ! महिलांसोबत संतापजनक कृत्य, धक्कादायक CCTV फुटेज समोर

निवृत्त अधिकाऱ्याने सोसायटीमधील महिलांशी गैरवर्तन करत पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kalyan Crime:  कल्याण पश्चिमेतील एका हायप्रोफाईल सोसायटीत निवृत्त पोलीस अधिकारी याने धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलांशी गैरवर्तन, अश्लील शिवीगाळ आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Nashik News: AI च्या मदतीने बनला 'पोलीस'; वर्दीचा रुबाब दाखवून महिलांना लुटायचा, कसा अडकला जाळ्यात?

निवृत पोलिसाची दादागिरी! महिलांशी गैरवर्तन

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याणमधील एका सोसायटीत निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या दादागिरीने रहिवाशांना हैराण केले आहे. या निवृत्त अधिकाऱ्याने सोसायटीमधील महिलांशी गैरवर्तन करत पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार,  वल्लभ टॉवर येथे राहणाऱ्या एक महिल लहान मुलाला घेऊन बाहेर जाण्यासाठी आपली दुचाकी पार्किंगमधून बाहेर काढत होत्या.

Advertisement

यावेळी सोसायटीतच राहणारे निवृत्त पोलीस अधिकारी बी. एल. पवार यांनी मुद्दाम आपली गाडी महिलेच्या गाडीमागे लावली. वारंवार हॉर्न वाजवूनही त्यांनी गाडी बाजूला घेतली नाही आणि तक्रारदार महिलेकडे  पाहण्यास सुरुवात केली.  यानंतर तिला शिवीगाळ केली ​या वादाचे रूपांतर पुढे मोठ्या हाणामारीत झाले. सोसायटीचे लोक जमा झाले असता, आरोपीने सर्वांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

धक्कादायक CCTV फुटेज! 

सोसायटीतील महिला व इतर सदस्याने त्यांना विरोध केला असता त्यांना देखील शिवीगाळ केली त्याचबरोबर त्यांना विरोध करणाऱ्या पुरुषांना देखील मारहाण केली. तक्रारदार महिलेचा विनयभंग करून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तिचे चारित्र्यहनन करणारे शब्द वापरले असल्याचे आरोप करत तक्रार या महिलेने केली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याविरोधात याआधीही दोनवेळा तक्रार देण्यात आली होती, मात्र त्याच्याविरुद्ध पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असेही नागरिकांनी म्हटले आहे. दरम्यान, या मारहाणीच्या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

(नक्की वाचा-  Iran-US War Update: जगाचं टेन्शन वाढलं! इराण-US युद्ध पुन्हा भडकणार? युद्धविरामानंतर 24 तासात काय काय घडलं?