जाहिरात

Iran-US War Update: जगाचं टेन्शन वाढलं! इराण-US युद्ध पुन्हा भडकणार? युद्धविरामानंतर 24 तासात काय काय घडलं?

US-Iran War Update: अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम २४ तासांतच संकटात सापडला आहे. अमेरिकेने इराणचा १० कलमी प्रस्ताव फेटाळला असून, इस्रायलने लेबनानवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत.

Iran-US War Update: जगाचं टेन्शन वाढलं! इराण-US युद्ध पुन्हा भडकणार? युद्धविरामानंतर 24 तासात काय काय घडलं?

Iran-US War Update: मध्य पूर्वेतील 40 दिवसांच्या भीषण संघर्षानंतर घोषित झालेला 'सीजफायर' (युद्धविराम) अवघ्या 24 तासात तुटताना दिसत आहे. करार होऊन 24 तास उलटत नाहीत तोच अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील परस्परविरोधी विधानांमुळे शांततेची आशा धूसर झाली आहे. कूटनीतिक चर्चा आणि जमिनीवरील वास्तव यामध्ये मोठी दरी निर्माण झाली असून, हे युद्ध पुन्हा एकदा भडकण्याची चिन्हे आहेत.

इराणच्या प्रस्तावाला केराची टोपली

अमेरिकेने इराणने दिलेल्या 10 कलमी शांतता प्रस्तावावर अत्यंत कडक शब्दात टीका केली आहे.  अमेरिकन प्रशासनाने म्हटले की, त्यांनी इराणचा प्रस्ताव 'कचऱ्याच्या पेटीत' टाकला आहे. अमेरिकेने स्पष्ट केले की, सीजफायरच्या अटींमध्ये लेबनानवरील हल्ले थांबवण्याचा समावेश नाही. अमेरिका या विषयात इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.

इस्रायलचा लेबनानवर हल्ला 

सीजफायर करारातील तांत्रिक त्रुटींचा फायदा घेत इस्रायलने लेबनानमधील हिजबुल्लाच्या तळांवर हल्ले अधिक तीव्र केले आहेत. आज झालेल्या ताज्या हल्ल्यांमध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. करारात लेबनानचा उल्लेख नसल्याने सैन्य मोहीम सुरूच राहील, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे. इस्रायल या सीजफायरच्या निर्णयावर आधीच नाराज असल्याचे समजते.

(नक्की वाचा-  US-Iran War : इराणची नवी खेळी! होर्मुजमधून जहाज वाहतूक सुरू होणार, मात्र भारतासह अनेक देशांना फटका बसणार)

इराणचा पलटवार

इस्रायलच्या कारवायांवर इराणने अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. "जर लेबनानवर एकही हल्ला झाला, तर हा युद्धविराम त्वरित संपुष्टात येईल," अशी चेतावणी इराणने दिली आहे. इराणने अमेरिका आणि इस्रायलला इशारा दिला आहे की, आता शांतता टिकवायची की नाही, हा चेंडू त्यांच्या कोर्टात आहे.

इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबफ यांनी स्पष्ट केले आहे की, करारातील महत्त्वाच्या अटींचे उल्लंघन झाले असल्याने आता युद्धविराम किंवा कोणत्याही वाटाघाटीला अर्थ उरलेला नाही. इस्लामाबादमध्ये होणाऱ्या निर्णायक चर्चेपूर्वीच हा करार अधांतरी लटकला आहे.

इराणच्या मते कोणत्या 3 अटी मोडल्या गेल्या? 

  1. लेबनानमध्ये युद्धविराम नाही: कराराच्या पहिल्या अटीनुसार लेबनानसह सर्व क्षेत्रांत त्वरित युद्धविराम होणे अपेक्षित होते. मात्र, इस्रायलने लेबनानवर आतापर्यंतचा सर्वात भीषण बॉम्बहल्ला सुरूच ठेवला आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही "हर जगह तुरंत सीजफायर" असे म्हटले होते, ज्याचे पालन झाले नाही.
  2. हवाई क्षेत्राचे उल्लंघन: इराणच्या फार्स प्रांतातील लार (Lar) शहरात एका घुसखोर ड्रोनला पाडण्यात आले. इराणच्या हवाई क्षेत्रात कोणताही हस्तक्षेप न करण्याची अट या ड्रोनमुळे मोडली गेल्याचा इराणचा दावा आहे.
  3. युरेनियम संवर्धनाचा हक्क: कराराच्या सहाव्या अटीनुसार इराणला युरेनियम संवर्धनाचा अधिकार देण्यात आला होता. मात्र, अमेरिकेने हा अधिकार नाकारल्याने इराणने संताप व्यक्त केला आहे.

(नक्की वाचा- Iran-US War: पायलटला वाचवण्यासाठी महाभारतातील रणनीती आली कामी; शत्रूच्या घरात घुसून अमेरिकेचा 'माईंड गेम')

काय असेल जागतिक परिणाम?

जर हा युद्धविराम मोडला, तर त्याचे गंभीर परिणाम जगावर होतील. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारा तेल पुरवठा विस्कळीत होऊन पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडू शकतात. हिजबुल्ला पूर्ण ताकदीने युद्धात उतरल्यास संपूर्ण आखाती देश या आगीत होरपळून निघतील.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com