Kalyan News: 11 वर्षाच्या मुलीवर रात्रभर अत्याचार, दुकानात कोंडून केले भयंकर कृत्य

पिडीत मुलगी खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहते. तिची आई भाजीपाला विकून कुटुंबाचा उदर निर्वाह करते.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान 

कल्याण-काळू नदीच्या किनारी शुटींग सुरु होते. शूटींग पाहण्यासाठी एक 11 वर्षाची मुलगी गेली होती. त्याठिकाणी असलेल्या किराणा मालाच्या दुकानदाराने त्याच वेळी डाव साधला. त्या मुलीला दुकानात बोलावले. तिला दुकानात डांबून ठेवले. तिच्यावर रात्रभर लैगिंक अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी मुलगी जेव्हा घरी परतली, तेव्ही तिने तिच्या आईला तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. तिच्या पालकांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मुलीवर लैगिंक अत्याचार करणारा आरोपी गणेश म्हात्रे याला अटक केली आहे. तो 21 वर्षाचा आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पिडीत मुलगी खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत  राहते. तिची आई भाजीपाला विकून कुटुंबाचा उदर निर्वाह करते. सोमवारी 8 वाजता पिडीत मुलगी मैत्रीणीकडे जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. तिच्या आईने तिचा सगळीकडे शोध घेतला. पण ती कुठेही मिळून आली नाही. दुसऱ्या दिवशी मुलगी राहत असलेल्या परिसरात आढळून आली. 

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?

तिच्या पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्ही तिने तिच्या पालकांना सांगितले की, काळू नदी किनारी शूटींग सुरु होते. ते पाहण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानाचा दुकानदार गणेश म्हात्रे यांनी पिडीत मुलीला दुकानाजवळ थांबायला सांगितले. ती थांबायला तयार नव्हती. त्याने तिला जबरदस्ती करुन दुकानाच्या आत घेतले. दुकानाचे शटर लावू तिला कोंडून ठेवले. असं तिने पालकांना सांगितलं.  

ट्रेंडिंग बातमी - Kalyan News: नशेचे इंजेक्शन, बिअर पाजून महिलेवर सामूहिक अत्याचार, राजकीय पुढाऱ्याचा ही समावेश

त्यावेळी तिला धमकावण्यात आलं. शिवाय  आरडाओरडा करशील तर तुझी बदनामी होईल असं ही तिला सांगितलं. कोणाला काही सांगितले तर तुला मारु टाकेन अशी धमकी देत तिच्यावर दोन वेळा लैगिंक अत्याचार केले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शिवाय आरोपी गणेश म्हात्रे याला अटक केली आहे. या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ माजली आहे.

Advertisement