अमजद खान
ड्रग्जचे इंजेक्शन आणि बिअर पाजून एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना कल्याणनजीक टिटवाळा परिसरात घडली आहे. टिटवाळा पोलिसांनी एका राजकीय पक्षाच्या नेत्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. या सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. शिवाय कल्याण डोंबिवली अशा घटना वाढल्याने चिंताही व्यक्त केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पिडीत तरुणी ही टिटवाळा परिसरातील बल्याणी येथे आजी आणि चुलत बहिणीसोबत राहते. 19 मार्च रोजी दहा वाजताच्या सुमारास या तरुणीचा आजी सोबत किरकोळ वाद झाला. त्यानंतर रात्री 11 वाजत्या सुमारास तरुणी तिची मैत्रीण जिनत कुरेशी हिच्या घरी गेली. त्यावेळी मैत्रीणीच्या घरात पती इरफान कुरेशी, मुलगा आणि शबनम शेख हे होते. जीनतच्या शेजारीच तरुणीची दुसरी मैत्रीण शबनम शेख ही देखील राहते. काही दिवस तरुणी ही जिनत आणि शबनमच्या घरात राहिली. 25 मार्च रोजी सकाळी साडे आकरा वाजताच्या सुमारास शबनम आणि जिनत यांनी बल्याणी परिसरात राहणारे गुड्ड अब्दुल रहीम याला बोलावून घेतले.
12 वाजताच्या सुमारास गुड्डू त्याची काळ्या रंगाची गाडी घेऊन आला. एनआरसी कंपनीच्या मागे सुरु असलेल्या चाळीचे काम पाहण्यासाठी जायचे आहे असे सांगून त्याने या तरुणीला त्या ठिकाणी नेले. यावेळी गुलफाम नावाचा तरुण देखील होता. आधी तरुणीला सांगितले गेले की, तुला घरी सोडू नंतर एनआरसी येथील चाळीतील घर बघण्यासाठी जाऊ. तसे न करता त्यानी त्यांची गाडी एनआरसी कंपनीकडे वळविली. घर दाखविण्याच्या बहाण्याने त्यांनी तिला एका घरात नेले.
ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?
तिला तिथे ड्रग्जचे इंजेक्शन आणि बिअर पाजली. तरुणी शुद्धीवर आली, तेव्ही ती कल्याणच्या रामबाग परिसरातील रेस्ट हाऊसमध्ये होती. इंजेक्शनची नशा असल्याने ती पुन्हा झोपी गेली. तिला दुसऱ्या दिवशी जाग आली. तिच्या अंगावर कपडे नव्हते. समोर लियाकत शेख नावाचा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी उभा होता. नंतर तिला परत नशेचे इंजेक्शन दिले. चार ते पाच दिवस तिला शुद्ध नव्हती. त्या काळात तिच्या सोबत गैरकृत्य करण्यात आल्याचा तिचा आरोप आहे. पिडीत तरुणीने हा प्रकार जिनत हिला सांगितला. तेव्हा जिनतने तिला हा प्रकार कोणाला सांगू नको, तुला फाशी देऊन मारु अशी धमकी दिली. शिवाय तुझ्या घरच्यां विरोधात खोटी तक्रार दे असे देखील तिला बजावले.
ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: पाकचा डाव उधळला! भारताने पाकिस्तानचे रडार सिस्टीम केली उद्धवस्त
सातत्याने दहा दिवस या तरुणीवर लियाकत शेख हा अत्याचार करीत असल्याचा आरोप तरुणीने केला आहे. एका घरात ठेवून पिडीत तरुणीला शुद्ध आल्यावर तिने घराच्या खिडकीतून आरडाओरड सुरु केली. एक व्यक्ती मदतीस आला. बाहेरचे कुलुप तोडून त्या तरुणीला त्या व्यक्तीने बाहेर काढले. तिला घरी सोडण्यात आले. घरी आल्यावर ही सगळी हकीगत तिने तिच्या आजीला सांगितली. या प्रकरणात टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार केली. टिटवाळा पोलिसांनी पिडीत तरुणीच्या फिर्यादीनुसार शबनम शेख, जीनत , गुड्डी, गुलफाम, लियाकत अली. एक अज्ञानत व्यक्ती आणि अली इराणी यांच्या विरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.