Kalyan News: हाताला काम नाही, खिशात पैसे नाहीत, तरुणाने असं काही केलं की थेट जेलमध्ये पोहोचला

23 वर्षांचा आशिष त्याच्याकडे काही कामधंदा नाही. घर चालविण्यास पैसे नाही. त्याला रिक्षा चालवायची होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान 

काही काम धंदा नाही. पैसेही नाहीत. घर कसे चालवायचे. या विवंचनेतून एका तरुणाने चोरीचा मार्ग निवडला. कल्याणमधील रस्त्यात उभी असलेली रिक्षा त्याने चोरी केली. तिच रिक्षा चालवून तो प्रवासी भाडे भरत होता. अखेर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या रिक्षआ चोराला अटक केली आहे.  आशीष मोरे असं या तरुणाचं नाव असून तो 23 वर्षाचा आहे.  त्याच्याकडून चोरी केलेली रिक्षा ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आशिष हा कर्जत जवळच्या भिवपूरी इथला रहिवाशी आहे.कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

कल्याणमधील रामबाग परिसरातून काही दिवसापूर्वी एक रिक्षा चोरीला गेली होती. रिक्षा चालकाने या प्रकरणाची तक्रार कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात केली होती. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत होते. याच दरम्यान महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी विकास मडके यांना एका गुप्त बातमीदाराने माहिती दिली की, रामबाग परिसरातून जी रिक्षा चोरीला गेली आहे. ती रिक्षा कल्याणमधील एका ठिकाणी उभी आहे. रिक्षा चालक प्रवाशांच्या प्रतिक्षेत उभा आहे. 

नक्की वाचा - Pandharpur News: दिरासोबत प्रेमसंबंध, मृत्यूचा बनाव अन् हत्या; सिनेमालाही लाजवेल अशा घटनेने सगळेच हादरले

विकास मडके आणि पोलिस कर्मचारी हे मिळलेल्या माहितीनुसार त्याठीकाणी पोहचले. रामबागेतून चोरीस गेलेली ती रिक्षा पोलिसांना समोरच दिसली. पोलिसांनी रिक्षा चालकाला विचारले,ही रिक्षा कुठून आणली. रिक्षाचे कागदपत्रे दाखव, परवाना दाखव. या प्रश्नानंतर आशीष मोरे हा गडबडला. त्याच्या कागदपत्रे आणि परवाना नव्हता. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच आशीष याने रिक्षा चोरी केल्याची कबूली दिली. मात्र आशिष मोरे हा सराईत रिक्षा चोरटा नाही. 

नक्की वाचा - Sangli News: सांगलीचा रँचो! 10 वीच्या विद्यार्थ्याचा देसी जुगाड, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना चाप बसणार

23 वर्षांचा आशिष त्याच्याकडे काही कामधंदा नाही. घर चालविण्यास पैसे नाही. त्याला रिक्षा चालवायची होती. त्याला ते शक्य झाले नाही. अखेर त्याने चोरीचा मार्ग निवडला. त्यातूनच त्याने रिक्षा चोरी केली. तिच रिक्षा कल्याणमध्ये चालवायला ही त्याने सुरुवात केली. मात्र त्याची ही चोरी लपू शकली नाही. तो पकडला गेला आहे. या प्रकरणात पोलिस पुढील तपास करीत आहेत. मात्र एका बेरोजगार तरुणाने चोरीचा मार्ग निवडला. बेरोजगारी तरुणाईला चोरी करण्यास भाग पाडत असल्याचे वास्तव समोर या निमित्ताने आले आहे.

Advertisement