
संकेत कुलकर्णी, पंढरपूर
Pandharpur Crime News : दिरासोबतचे प्रेमसंबंध टिकवण्यासाठी विवाहितेने स्वत:च्याच मृत्यूचा बनाव रचल्याची घटना मंगळवेढ्यातून समोर आली आहे. मात्र जळीतकांडाच्या घटनेत आलेल्या ट्विस्टमुळे सर्वांनाच धक्का बसला. याप्रकरणी मृत्यूचा बनाव रचलेली महिला आणि तिच्या दिराला पोलिसांना अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांची पत्नी किरण राहत होते. 14 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास किरणने आपल्या शेतातील कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली. मृतदेह पूर्णत: जळाल्याने किरणच्या वडिलांनाही आपल्या मुलीचा मृतदेह ओळखता आला नाही.
मात्र किरणच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत पोलिसांकड सविस्तर चौकशी करण्याची विनंती केली. किरणने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला. विवाहितेच्या माहेरच्या लोकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी देखील चौकशी सुरु होता.
नक्की वाचा - Crime News: नवऱ्याला फसवण्यासाठी 5 वर्षाच्या पोटच्या मुलीची केली हत्या, महिलेचं संतापजनक कृत्य
चौकशीदरम्यान पोलिसांनी नागेशचा भाऊ निशांत याच्याकडे आपला मोर्चा वळवला. पोलिसांनी मोबाईलचे सीडीआर तपासले आणि निशांतवरचा पोलिसांचा संशय आणखी बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर किरण आणि निशांतचं बिंग फुटले. निशांत (दीर) आणि किरणचे प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. किरण आणि निशांत यांना एकत्रित राहता यावे यासाठी घरातून पळून न जाता किरणने आत्महत्या केली आहे. असे भासवत मृत्यूचा बनाव करण्यात आला. मात्र मृत्यू पावलेली किरण कराडमध्ये असल्याचे आढळून आले. याबाबत किरण हिला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. तर किरणचा प्रियकर असणारा दीर निशांत सावंत यालाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
(नक्की वाचा - Amaravati Fake Wedding : इन्स्टाग्रामच्या मदतीने बारमध्ये फेक वेडिंग, अल्पवयीन मुला-मुलींच ते दृश्य पाहून पोलिसांनाही बसला धक्का!)
मृत महिला कोण?
या सर्व घडामोडींमध्ये किरण सावंत जिवंत आहे, तर तिच्या जागी कुठल्या महिलेचा मृतदेह कडब्याच्या गंजीत जळाला, हा प्रश्न पुढे आला. मात्र पोलीस तपासानंतर एका वेडसर महिलेला किरण आणि निशांत यांनी पकडून आणले आणि तिचा गळाव दाबून तिची हत्या केली. त्यानंतर संबंधित वेडसर महिलेचा मृतदेह कडब्याच्या गंजीत ठेवून पेटवून दिले आणि किरणच्या मृत्यूचा खोटा बनाव केला. मात्र पोलिसांनी आता याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world