जाहिरात

Kalyan Crime: विकृत विशाल गवळीचा वैद्यकीय रिपोर्ट आला, डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा

कल्याण पूर्वेत राहणाऱ्या 12 वर्षीय मुलीचं 23 डिसेंबर रोजी सायंकाळी अपहरण झालं होतं. विशाल गवळी याने तिचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

Kalyan Crime: विकृत विशाल गवळीचा वैद्यकीय रिपोर्ट आला, डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा
कल्याण:

कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातला आरोपी विशाल गवळी हा मानसिक दृष्ट्या फिट आहे की नाही याबाबत चर्चा सुरू होती. त्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे होते. आधी तो केवळ मानसिक दृष्ट्या फिट नाही त्यामुळे त्याला जामिन मिळाला होता. हे पाहात त्याची वैद्यकीय तपासणी केली गेली. त्याच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्याचा जो अहवाल आला आहे तो धक्कादायक आहे. त्यामुळे आता वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विशाल गवळी याने आधीच्या अशाच प्रकारची घाणेरडी कृत्य केली आहे. मात्र त्या प्रकरणांमध्ये मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट त्याने कोर्टात सादर केलं होतं. त्यामुळे त्याला जामीन ही मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणात त्याची पुन्हा एकदा मानसिक आरोग्याची चाचणी घेणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. त्या पार्श्वभूमीवर विशाल गवळी याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलं होतं. त्याची यावेळी तपासणी करण्यात आली. तो खरोखर मानसिक रुग्ण आहे की नाही यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वा चाचण्या यावेळी करण्यात आल्या.  

ट्रेंडिंग बातमी - Akola Crime news: शेळीचं पिल्लू आणायला म्हणून गेली अन् चिमुकली बरोबर भयंकर घडलं

सर्व चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी आपला रिपोर्ट सादर केला आहे. डॉक्टरांनी तो मानसिक दृष्ट्या फिट असल्याचा रिपोर्ट दिला आहे. विशाल गवळी हा "वेल ओरिएंटेड, कॉन्शियस, को-ऑपरेटिव्ह, ओरिएंटिंग टू टाइम, प्लेस" असल्याचं डॉक्टरांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. तसंच त्याला कोणत्याही मानसोपचाराची  गरज नसल्याचेही सांगितले आहे.   त्यामुळे हा नराधम मनोरुग्ण नसून मानसिक दृष्ट्या फिट असल्याचं सिद्ध झालं आहे. मात्र असं असताना त्याला मनोरुग्ण असल्याचे प्रमाणपत्र कुणी आणि का दिले हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Viral video: हॉर्न वाजवण्यावरून महानाट्य, रागाच्याभरात गाडीच्या टपावर चढला अन्...

कल्याण पूर्वेत राहणाऱ्या 12 वर्षीय मुलीचं 23 डिसेंबर रोजी सायंकाळी अपहरण झालं होतं. विशाल गवळी याने तिचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.  त्यानंतर तिची क्रुरपणे हत्या केली. हा नराधम इतक्यावरच थांबला नाही, तर या चिमुकलीच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर घालत त्याने विकृतीचा कळस गाठला. यानंतर तो आणि त्याच्या पत्नीने मिळून या मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह सुटकेसमध्ये भरला. तो बापगाव परिसरात फेकून दिला. या सगळ्या प्रकरणानंतर विशाल गवळी हा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं बायकोच्या माहेरी पळून गेला होता. मात्र पोलिसांनी त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या. तसंच त्याच्या पत्नीलाही अटक केली. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com