अमजद खान
दिसायला सुंदर पण कारनामे भयंकर असं म्हणावी अशी घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. फिजा इराणी या तरुणीचे कारनामे ऐकले तर तुम्हाला धक्का बसल्या शिवाय राहाणार नाही. दिसायला सुंदर असल्याचा ती पूर्ण फायदा घेते. त्या आड ती महाविद्यालयीन तरुणां बरोबर असा काही खेळ करते की त्यांचे आयुष्यच धोक्यात टाकते. तिच्या या कारनाम्याची खबर जेव्हा पोलिसांनी लागली त्यावेळी तिच्या भोवती फास आवळला अन् तिला ताब्यात घेण्यात आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फिजा इराणी ही तरुणी आपल्या सौंदर्याचा गैर फायदा घेत होती. कल्याणमध्ये स्कुटीवर बसून ती चक्का एमडी ड्रग्जची विक्री करायची. तिचं लक्ष्य हे महाविद्यालयातले तरुण असायचे. त्यामुळे अनेक तरुणांना या ड्रग्जचे व्यसन लागले होते.ते त्याच्या आहारी गेले होते. त्यातून फिजा पैसे उकळत होती. तरुणांचे भविष्य होण्या आधीच ते खराब होत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली त्यांनी फिजा भोवती फास आवळण्याचा निर्णय घेतला.
ती ड्रग्ज घेवून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचला गेला. ती कल्याणच्या खडकपाडा परिसरात नेहमी प्रमाणे स्कुटीवर आली. त्यावेळी पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली. शिवाय तिची गाडी ही तपासली. त्यावेळी त्यांना गाडीत जवळपास दोन लाखाचे ड्रग्ज सापडून आले. त्याच वेळी तिला अटक करण्यात आली. चौकशी नंतर अनेक गोष्टी समोर आल्या.
फिजा हिला या आधी तीन वेळा अटक झाली होती. ही तिची चौथी अटक होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये फिजा खूप फेमस आहे. इतकेच नाही तर कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात ही ती एमडी ड्रग सप्लाय करते. पोलिसांनी आता फिजा विरोधात ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी मागणी ही नागरिकांकडून होत आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याण घेटे यांनी कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.