Kalyan News: प्रेयसीसमोर 'पेंद्या भाई'चा गेम,कल्याण पोलिसांचा कडक हिसका; आरोपींची भर रस्त्यात उतरवली मस्ती!

Kalyan News:  कल्याणच्या आडवली परिसरात जुन्या वैमनस्यातून तरुणावर सपासप वार करून हत्या करणाऱ्या आरोपींची मानपाडा पोलिसांनी थेट धिंड काढली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan News : गुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी हे कडक पाऊल उचलले.
कल्याण:

Kalyan News:  कल्याणच्या आडवली परिसरात जुन्या वैमनस्यातून तरुणावर सपासप वार करून हत्या करणाऱ्या आरोपींची मानपाडा पोलिसांनी थेट धिंड काढली आहे. प्रेयसीसमोर घडलेल्या या थरारक हत्याकांडाने परिसरात मोठी घबराट पसरली होती, ज्यामुळे गुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी हे कडक पाऊल उचलले.

काय आहे प्रकरण?

कल्याणच्या आडवली परिसरात 16 जुलै रोजी मध्यरात्री अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाई या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. जुन्या वादातून आरोपींनी अर्जुनवर तब्बल 16 वार करून त्याचा जागीच जीव घेतला. यावेळी त्याच्या बचावासाठी धावलेल्या प्रेयसीवरही हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News : भरपावसात गाडीला बांधलं अन् थेट...; कात्रजमधील हत्येनंतर पोलिसांनी गुन्हेगारांना शिकवला असा धडा )

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 03 आणि मानपाडा पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. पोलिसांनी सापळा रचून अविनाश लल्लन झा, कल्पेश मढवी आणि करण गायकवाड या तिघांना बेड्या ठोकल्या.

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणची शिक्षिका रहस्यमयरित्या गायब, 4 दिवसांनी सापडला मृतदेह; पोलिसांनी असा लावला हत्येचा शोध )

मुख्य आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल

अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी अविनाश झा याच्यावर दरोडा, मारहाण आणि खुनाचा प्रयत्न करण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींची परिसरातील दहशत संपवण्यासाठी पोलिसांनी त्यांना आडवलीमध्ये थेट रस्त्यावर चालवत त्यांची धिंड काढली. या हत्येतील आणखी एका फरार आरोपीचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.
 


Topics mentioned in this article