अमजद खान
पेशाने व्यवसायीक असलेल्या महेश भोईर यांचा सहा वर्षाचा मुलगा कैवल्य याचे अपहरण झाले होते. शुक्रवारी सकाळीच डोंबिवली पिसवलीतून हे अपहरण झाल्याचे रिक्षा चालक महेश भोईर याने सांगितले. त्याच्या सुटकेसाठी दोन कोटीची खंडणी ही मागण्यात आली. त्यासाठी वॉट्सअप लिंकचा वापर करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी सुत्र हलवत अपहरण करणाऱ्यांच्या काही तासात मुसक्य आवळल्या. कैवल्यची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र ज्यावेळी आरोपींची चौकशी करण्यात आली, त्यावेळी मात्र या अपहरणाची धक्कादायक अशी इनसाईट स्टोरी समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या अपहरणाचे मास्टर माईंड रिक्षा चालक विरेन पाटील हा होता. तर त्याला विजय देवडेकर याची साध होतीय हा विजय महेश भोईर यांचा मित्र आहे. महेश भोईर यांनी शेती विकली आहे. त्यातून त्यांना पाच कोटी मिळाल्याचे मिळाले आहे, हे देवडेकर याला माहित होते. त्याच वेळी त्याचा मनात पैशांची लालसा निर्माण झाली. 27 मार्चला विजयचा वाढदिवस होता. त्या दिवशी त्याच्या कोनगावच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. त्यात त्याने विरेन या रिक्षा चालक मित्रालाही बोलवलं होतं. हाच महेश भोईर यांच्या मुलाला शाळेत नेण्याचे आणि आणण्याचे काम करतो.
ट्रेंडिंग बातमी - Kalyan News: 2 कोटींच्या खंडणीसाठी रिक्षा चालकाने केले सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण
रात्री उशीरापर्यंत ही पार्टी सुरू होती. त्यावेळी देवडेकर याने विरेनला पाच कोटीची माहिती दिली. जर आपण महेशच्या मुलाचे अपहरण केले तर त्याच्याकडून दोन कोटी खंडणी घ्यायची. त्यानंतर आपली लाईफ सेट होवून जाईल असं ही त्याला सांगितलं. तिथेच अपहरणाचा प्लॅन ठरला. सर्व आरोपी हे त्या पार्टीत उपस्थित होते. विशेष म्हणजे ते सर्व जण महेश भोईर यांच्या ओळखीचे होते. ठरल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी विरेन सहा वर्षाच्या कैवल्यला घेण्यासाठी घरी गेला. त्याला घेतल्यानंतर त्याचे अपहरण झाले. फोन करून दोन कोटीची खंडणीही पुढे महेश यांच्याकडे मागितली गेली. मात्र त्यांनी याची कल्पना पोलिसंना दिली.
पोलिसांनी सर्वात आधी रिक्षा चालक विरेन पाटील याच्या भावाला ताब्यात घेतलं. त्याने सकाळी कैवल्यला घेवून विरेन गेला असल्याचं सांगितलं. शिवाय त्याच्या बरोबर संकेत मढवी ही होता ही माहिती त्याने दिली. संकेत हा काही वेळाने त्या रिक्षातून उतरला होता. त्यामुळे पोलिसांनी संकेतला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली. पण त्याने काही सांगितले नाही. मात्र त्याला पोलिसीखाक्या दाखवल्यानंतर तो पोपटासारखा बोलला.त्याने विरेन पाटील याला मेसेज केला. पोलिसांना सर्व समजले आहे. त्यामुळे आता काही फायदा नाही. असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी शहापूर इथून विरेनलाही ताब्यात घेतले.
तीन तासाच्या आत मानपाडा पोलिसांनी मुलाची सुटका केली. या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन मुलांना ही ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ही अल्पवयीन मुले चांगल्या घरातली असून ती चांगल्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सगळीकडे कौतूक होत आहे. पण अपहरणाचा हा कट कसा शिजला हे समोर आल्यानंतर तस सर्वच जण आवाक झाले आहेत.