Kalyan News: कल्याणमध्ये थरार! ड्रायव्हरला मारहाण करून Ola Car पळवली; ‘या’ कारणामुळे चोर 2 तासांत जाळ्यात

Kalyan News:  कल्याणमध्ये पहाटेच्या वेळी ग्राहकाला घेण्यासाठी थांबलेल्या एका Ola Car चालकाला भर रस्त्यात तीन मद्यधुंद आरोपींनी बेदम मारहाण केली आणि त्याची कार पळवून नेली.

जाहिरात
Read Time: 3 mins
Kalyan News: अवघ्या 2 तासांत कोळसेवाडी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून पळवलेली कार हस्तगत केली आहे.
कल्याण:

Kalyan News:  कल्याण शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना उघड आहे. पहाटेच्या वेळी ग्राहकाला घेण्यासाठी थांबलेल्या एका Ola Car चालकाला भर रस्त्यात तीन मद्यधुंद आरोपींनी बेदम मारहाण केली आणि त्याची कार पळवून नेली. ही घटना कल्याणच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभी करणारी होती. मात्र, पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि कारमधील Global Positioning System (GPS) मुळे अवघ्या 2 तासांत कोळसेवाडी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून पळवलेली कार हस्तगत केली आहे.

पहाटे काय घडले?

गुरुवारी पहाटे (23 ऑक्टोबर 2025) सुमारे 4:30 वाजता ही धक्कादायक घटना घडली. कल्याण पूर्वेकडील काटेमानिवली परिसरात राहणाऱ्या एका महिलेला त्यांच्या कार्यालयातून पिकअप करण्यासाठी Ola Car आली होती. कारचालक सर्वेश तिवारी हे 'नितीनराज बार' समोर कार उभी करून त्या महिलेची वाट पाहत होते. त्याच वेळी जवळच्या उड्डाणपुलाखाली तीन तरुण दारू पीत बसले होते.

( नक्की वाचा : Kalyan News : 'फटाके' फोडले, 'भाई' बोलवले! कल्याणमध्ये मध्यरात्री 'गँगवॉर'सदृश राडा; पाहा Video )
 

चालकाला मारहाण आणि कारची तोडफोड

सर्वेश तिवारी यांना तिथे उभे असलेले पाहून ते तिघेही त्यांच्या दिशेने आले. "तू इथे काय करतोय? तू कोण आहेस?" अशी विचारणा त्यांनी केली. सर्वेश यांनी आपण ग्राहक महिलेला घेण्यासाठी आलो असल्याची माहिती दिली. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या त्या आरोपींनी सर्वेश यांचे काहीही ऐकले नाही. त्यांनी थेट सर्वेश तिवारी यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही, तर त्यांनी सर्वेश यांच्या कारच्या काचाही फोडल्या.

कार घेऊन पळ काढला

मारहाण केल्यानंतर, या आरोपींनी जबरदस्तीने कारचालकाकडून कारची चावी हिसकावून घेतली आणि ती Ola Car घेऊन तिघेही पसार झाले. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

Advertisement

( नक्की वाचा : Akola News: अकोला हादरले! गजानन हॉस्पिटलमध्ये रुग्णाचे टोकाचे पाऊल; दरवाज्यातून समोर आले भयावह सत्य )
 

पोलिसांची तत्काळ कारवाई आणि तपास

या घटनेनंतर कारचालक सर्वेश तिवारी आणि संबंधित महिलेने तातडीने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी लगेच तपासाची चक्रे फिरवली.

GPS ठरले गेमचेंजर

या तपासात कारमध्ये बसवलेले GPS तंत्रज्ञान पोलिसांसाठी 'गेमचेंजर' ठरले. जीपीएस ट्रॅकिंगमुळे पोलिसांना पळवून नेलेल्या कारचे अचूक लोकेशन मिळाले. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी संदीप भालेराव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने GPS च्या मदतीने आरोपींचा माग घेतला.

Advertisement

2 तासांत आरोपी ताब्यात

पोलिसांनी अवघ्या 2 तासांच्या आत लूट करणाऱ्या तिन्ही आरोपींना शोधून काढले आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेली Ola Car देखील यशस्वीरित्या हस्तगत केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी विजय भिसे, अमरदीप गुप्ता आणि अविनाश झा या तिघांना ताब्यात घेतले आहे. भर रस्त्यात झालेली ही मारहाण आणि लूटमार अत्यंत गंभीर असली तरी, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आरोपींना लगेच पकडणे शक्य झाले.
 

Topics mentioned in this article