Kalyan News : कल्याण रेल्वे स्टेशन या गजबजलेल्या परिसरात एका स्पा मसाज पार्लरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा पर्दाफाश कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी केला आहे. अवंतरा स्पा नावाच्या या मसाज पार्लरवर महात्मा फुले पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.
या कारवाईत मॅनेजर नौशाद शेख, चालक योगेश चव्हाण याला अटक करण्यात आलीय. तर तिसरा आरोपी भीमसिंग नाईक हा तिसरा आरोपी फरार आहे. या स्पा पार्लरमधून 10 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण रेल्वे स्टेशन वल्लीपूर रोड या गजबजलेल्या परिसरात अवंतरा मसाज पार्लर नावाने अवंतरा स्पा नावाने मसाज पार्लर थाटण्यात आले होते. या मसाज पार्लरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती.
( नक्की वाचा : Dombivli : डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरुन तरुणानं मारली उडी, धक्कादायक आरोपानं खळबळ )
या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवंतरा मसाज पार्लरमध्ये छापा टाकला. यादरम्यान या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची दिसून आले. महात्मा फुले पोलिसांनी तत्काळ या मसाज पार्लरचा मॅनेजर नौशाद शेख, चालक योगेश चव्हाण यांना बेड्या ठोकल्या. या मसाज पार्लरमध्ये महिलांना कामावर ठेवून पैशांचे आमिष दाखवत महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या मसाज पार्लरमधील 10 पीडित महिलांचे सुटका केली आहे.