कल्याणच्या चप्पल विक्रेत्याचे 'डर'मधील शाहरुखसारखे उद्योग, पोलिसांनी जिरवली मस्ती

'डर' मधील 'राहुल मेहरा' सारखे माथेफिरु आजही देशातल्या अनेक भागात आहेत. कल्याणमधल्या एका चप्पल विक्रेत्याचे देखील असेच उद्योग सुरु होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण पोलिसांनी चप्पल विक्रेत्याला अटक केलीय.
कल्याण:

अमजद खान, प्रतिनिधी

बॉलिवुडमधील सुपरस्टार शाहरुख खाननं डर या सिनेमात एकतर्फी प्रेमात माथेफिरु बनलेल्या तरुणाची भूमिका केली होती. त्या सिनेमात तो अभिनेत्री जुही चावलाचा पाठलाग करणे, तिला मिस कॉल देऊन त्रस्त करणे हे उद्योग करत असे. डर सिनेमाला आता 3 दशकं उलटली आहेत. त्यानंतरही त्याचा परिणाम कमी झालेला नाही. 'डर' मधील 'राहुल मेहरा' सारखे माथेफिरु आजही देशातल्या अनेक भागात आहेत. कल्याणमधल्या एका चप्पल विक्रेत्याचे देखील असेच उद्योग सुरु होते. पोलिसांनी त्याला अटक केलीय. 

कल्याणमधील महिला डॉक्टरचा सातत्यानं पाठलाग करणे तसंच त्यांना मिस कॉल देऊन त्रस्त करणाऱ्या माथेफिरुला पोलिसांनी अटक केलाीय. मनसाराम धनवरे असं या माथेफिरुचं नाव आहे. त्याचं या डॉक्टरच्या क्लिनिकसमोरच चप्पल विक्रीचं दुकान असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कल्याण पूर्व भागात या महिला डॉक्टरचं क्लिनिक आहे. त्या क्लिकसमोरच चप्पल विक्रेत्याची टपरी आहे. मनसारम धावरे ही टपरी चालवतो. पण, त्याचं या डॉक्टरवर सतत लक्ष होतं. डॉक्टरांचा घरापर्यंत पाठलाग करणे,  काही तरी कारण देऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे आणि सतत मिस कॉल देणे हे प्रकार तो करत होता. 

( नक्की वाचा : शाळकरी मुलांनी रिल्ससाठी चोरल्या महागड्या कार, एका चुकीमुळं फुटलं बिंग )
 

धावरेच्या या त्रासाला कंटाळून या महिला डॉक्टरनी कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलाीय. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. धावरेवर सीआरपीसी 576 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. 
 

Advertisement
Topics mentioned in this article