अमजद खान, प्रतिनिधी
Kalyan News : कल्याण आणि डाेंबिवलीत स्टेशन परिसरात गेल्या काही दिवसाापासून रिक्षा चालकांची मुजोरी जास्त वाढली आहे. किरकोळ कारणावरुन प्रवाशांना मारहाण केली जाते बस चालक कंडक्टरला मारहाण केली जाते. कल्याणमध्ये मागच्या आठवड्याच पुढे बसण्याच्या वादातून एका प्रवाशावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या अन्य दोन जणांवरही रिक्षा चालकानं हल्ला केला. मारुफ पोके असं या प्रकरणातल्या आरोपी रिक्षाचालकाचं नावं होतं.
या प्रकरणात महात्मा फुले पोलिसांनी रिक्षा चालक मारुफ पोके याला अटक केली. त्याची स्टेशन परिसरात वरात काढून त्याची चांगलीच जिरवली आहे. त्याची ही अवस्था पाहन अन्य रिक्षा चालकांनाही स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
काही दिवसापूर्वी डोंबिवली स्टेशन परिसरात बस चालक आणि रिक्षा चालकाचा वाद झाला. या वादात रिक्षा चालक अमीन फरीद तडवी याने केडीएमटीच्या एका बस कंडक्टर आणि चालकाला मारहाण केली. जखमी बस कंडक्टरने या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसानी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रिक्षा चालकाच्या विरोधात कारवाई केली. याच दिवशी कल्याण स्टेशन परिसरात रिक्षा चालक मारुफ पोके याने एका प्रवाशावर प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्राने केलेल्या राकेश गंभीर जखमी झाला. त्याला वाचविण्यासठी दोन जण पुढे आले. त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला.
( नक्की वाचा : कल्याण स्टेशन परिसरात रिक्षा चालकाकडून प्रवाशांवर जीवघेणा हल्ला ! )
या प्रकरणात फरार झालेल्या रिक्षा चालक मारुफ पोके याला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली. शनिवारी संध्याकाळी एका प्रवाशाचा रिक्षा चालकासोबत वाद झाला होता. त्या वादाप्रकरणीही पोलिसांनी रिक्षा चालकाच्या विरोधात कारवाई केली आहे. मात्र मारुफकडून प्रवाशावर ज्या प्रकारे चाकू हल्ला करण्यात आला. त्याचे गांभीर्य पाहता कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी त्याची चांगलीच जिरवली आहे.
वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे यानी मारुफ पोके याची स्टेशन परिसरात वरात काढली. त्याची सर्व रिक्षा स्टँडवर वरात काढण्यात आली. मारुफला पाहून रिक्षा चालक हैराण झाले. प्रवाशांसोबत चुकीची वागणूक केली तर हे परिमाण भाेगावे लागतील असा गर्भीत इशारा पोलिसांनी सर्व रिक्षा चालकासह टॅक्सी चालकांना दिला आहे