अमजद खान, प्रतिनिधी
भूक लागल्यावर झटपट खाता येणारा आणि हॉटेलमध्ये सहज उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे समोसा. मुंबई आणि परिसरात तर अनेक भागात वडापाव आणि समोसाचे स्टॉल प्रसिद्ध आहेत. तिथं नेहमी गर्दी असते. तुम्ही जो समोसा खाता तो कसा असतो? तो समोसा तुमच्या आरोग्यासाठी धोकायदायक ठरु शकतो? हा विचार तुम्ही केला आहे का? हे सर्व प्रश्न कल्याणमधील एका धक्कादायक प्रकारामुळे उपस्थित झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
कल्याणच्या मोहने परिसरात फेरीवाल्याकडून घरोघरी जाऊन समोसे विकले जातात. हे समोसे मोठ्या प्रमाणात लहान मुले खातात. . हे समोसे खराब बटाट्यापासून तयार केले जात असल्याचा प्रकार मनेसे पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे. मनसे पदाधिकारी विनोद पाटील यांच्यासह मनसे पदाधिकारी यांनी समाेसे तयार करणाऱ्या गाळ्यात जाऊन वस्तूस्थिती लोकांसमोर मांडली. समाेसे तयार करणाऱ्या संतोष नावाच्या व्यक्तीला मारहाण करुन अशा प्रकारचे धंदे करु नयेत अशी ताकीद दिली आहे.
( नक्की वाचा : Kalyan : कल्याण स्टेशन परिसरात परप्रांतीय फेरीवाल्यांची गुंडगिरी, तरुणाला मारहाण करुन लुटले )
काही नागरिकांनी फेरीवाल्यांकडून विकले जाणारे समोसे खराब असल्याचे मनसेच्या कार्यकत्यांना सांगितले होते. त्यानंतर कल्याण जवळच्या मोहने गाळेगाव परिसरातील समोसा विक्री करणाऱ्या गाळ्याला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. संतोष नावाच्या व्यक्तीचा हा गाळा होता. तेथील प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला. ज्या बटाट्याने समोसे तयार केले जात होते. जात होते. ते खराब होते. गाळ्यात अस्वच्छता होता. खराब पाणी, खराब वातावरणात हे समोसे तयार केले जात होते. हे पाहून मनसे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी संतोष नावाच्या समोसे तयार करणाऱ्याला चांगलाच चोप दिला.
फेरीचा धंदा करुन गृहोपयोगी वस्तू विकल्या जातात. त्यांचा दर्जाही सुमारच असतो. मात्र खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यांच्या विरोधात महापालिका, पोलिस प्रशासन, अन्न औषध प्रशासनाकडून कोणताही कारवाई केली जात नाही. आता ही घटना उघड झाल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का? हा प्रश्न विचारला जात आहे.