Kalyan : 'कल्याणच्या शाळेत महिला विश्वस्तांकडून अश्लील कृत्य सुरु' माजी नगरसेवकाचा खळबळजनक आरोप

कल्याणमधील एका प्रसिद्ध शाळेतील घटनांवरुन माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि विश्वस्त आमने-सामने आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान, प्रतिनिधी

कल्याणमधील एका प्रसिद्ध शाळेतील घटनांवरुन माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि विश्वस्त आमने-सामने आले आहेत. या शाळेत गायकवाड दादागिरी करत आहेत, असे आरोप करण्यात आले होते. त्यावर गायकवाड यांनी शाळेच्या महिला विश्वस्तांवर खळबळजनक आरोप केले आहेत. या शाळेत महिला विश्वस्तांकडून अश्लील कृत्य सुरु आहेत, असा आरोप गायकवाड यांनी केलाय. या गैरकृत्याचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ पोलीस प्रशासन तसंच धर्मदाय आयुक्तांना देणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची कारवाई काय होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

कल्याणच्या एका प्रसिद्ध शाळेत महेश गायकवाड यांच्या समर्थकांनी शाळेच्या वॉचमनला मारहाण केली होती. मात्र ही मारहाण वॉचमनने शिवीगाळ केल्याने करण्यात आली, असा गायकवाड यांच्या समर्थकांचा दावा आहे.मात्र आता या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात येत आहे. या शाळेत सर्वेसर्वा राहण्यासाठी दबाव टाकतात. ते शाळेत गुंड घेऊन येतात, मुख्यमंत्र्यांनी याकडं गांभीर्यानं लक्ष दिले पाहिजे अशी मागणी शाळेच्या विश्वस्तांनी केला आहे. 

( नक्की वाचा : Kalyan News : KDMC चा कहर, 5 तास रुग्णवाहिका नाही, हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळच महिलेचा मृत्यू )
 

गायकवाड यांचा पलटवार 

महेश गायकवाड यांनी शाळा विश्वस्तांच्या आरोपाला उत्तर देताना आणखी खबळजनक आरोप केले आहेत. 'शाळा प्रशासनामधील एक महिला पदाधिकारी एका पुरुषासोबत खुलेआम अश्लील चाळे करते.  विद्यार्थ्यांसमोर हे अश्लील चाळे सुरू असतात. काही विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना या संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली. ही तक्रार पालकांनी माझ्याकडे केली होती. या प्रकारचे अश्लील कृत्य शाळेत होऊ नये आणि त्या दोघांना मी ताकीद दिली होती, तरी पण ते थांबत नाही. 

या संपूर्ण प्रकरणाची धर्मदाय आयुक्तांकडे आणि कल्याण पोलिसांकडे मी पुराव्यांसह तक्रार केली आहे. बदलापूरसारखी घटना घडू शकते. असे घडू नये यासाठी मी शाळा प्रशासनाला वारंवार यासाठी मी प्रयत्न करत होतो . मात्र या तक्रारीवरून माझ्यावरच बिनबुडाचे आरोप शाळा प्रशासनांनाकडून केले जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. नाहीतर अनुचित घटना घडेल, असा दावा गायकवाड यांनी केलाय. काही राजकीय व्यक्तींच्या सांगण्यावरुन हे आरोप होत असल्याचा दावा देखील गायकवाड यांनी केला आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article