Shocking News : एका जिवाभावाच्या मित्राने केवळ 500 रुपयांसाठी आपल्याच मित्राचा असा अंत केला, ज्याचा विचार करूनही अंगावर काटा येईल. किरकोळ पैशांच्या वादातून सुरू झालेला हा प्रकार इतक्या भयानक थराला गेला की, आरोपीने माणुसकीच्या सर्व सीमा ओलांडल्या. भरवशाच्या मित्रानेच मृत्यूचा असा सापळा रचला की, त्यातून बाहेर पडणे अशक्य होते. हत्येनंतर मृतदेहाची जी अवस्था केली गेली, ती पाहून पोलीसही हादरून गेले आहेत.
काय आहे प्रकरण?
माणुसकीला काळिमा फासणारी ही क्रूर घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमधील गोविंद नगर भागात घडली आहे. या प्रकरणातील मृताचे नाव राहुल अवस्थी असून तो 35 वर्षांचा होता. राहुल एका पेट्रोल पंपावर सेल्समन म्हणून काम करत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलने आपला मित्र कामता शर्मा याच्याकडून 500 रुपये उधार घेतले होते.
हे पैसे परत देण्यावरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते. जेव्हा कामताने पैशांची मागणी केली, तेव्हा राहुलने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. याच रागातून कामताने आपल्या पुतण्यासोबत मिळून राहुलचा काटा काढण्याचे ठरवले.
(नक्की वाचा : Trending News : पाळीव कुत्रा आजारी असल्याने दोन बहिणी नैराश्यात, टोकाच्या निर्णयाने कुटुंब उद्ध्वस्त )
पार्टीच्या बहाण्याने बोलावले आणि ...
घटनेच्या दिवशी कामताने राहुलला दारू पिण्याच्या बहाण्याने निराला नगर ग्राउंडवर बोलावले. राहुल आपल्या वडिलांना मोबाईल देऊन मित्रासोबत बाईकवर गेला होता, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झाले आहे. तिथे पोहचल्यानंतर पुन्हा पैशांवरून वाद सुरू झाला.
कामता आणि त्याचा पुतण्या मोहित शर्मा यांनी राहुलला बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी राहुलने जॅकेट घातले असल्याने त्याला जास्त मार बसत नव्हता. त्यामुळे या नराधमांनी आधी त्याचे जॅकेट आणि कपडे उतरवले आणि त्यानंतर त्याला बेदम मारले.
दगडाने ठेचले आणि मृतदेह कुत्र्यांच्या हवाली केला
मारहाणीमुळे राहुल बेशुद्ध पडल्यानंतर आरोपींचे समाधान झाले नाही. त्यांनी जवळील वीट आणि दगडाने राहुलचे डोके आणि चेहरा पूर्णपणे ठेचून टाकला. इतकी क्रूरता दाखवल्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह एका निर्जन ठिकाणी फेकून दिला.
ज्या ठिकाणी मृतदेह फेकला होता, तिथे भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला, तेव्हा त्यांना मृतदेहापासून 50 मीटर अंतरावर राहुलचे कपडे सापडले होते.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून डीसीपी दक्षिण दीपेंद्र नाथ चौधरी यांनी तपासासाठी 4 टीम तयार केल्या होत्या. राहुलच्या वडिलांच्या कामाच्या ठिकाणचे म्हणजेच ऑईल डेपोच्या आसपासचे सीसीटीव्ही तपासले असता, राहुलच्या बाईकवर कामता बसलेला दिसला. याच धाग्यावरून पोलिसांनी कामताला ताब्यात घेतले आणि कडक चौकशी केली.या चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला.
पोलिसांनी कामता शर्मा आणि मोहित शर्मा या काका-पुतण्याला अटक केली आहे. इतकी भयानक हत्या करूनही आरोपींच्या चेहऱ्यावर साधे दु:ख किंवा पश्चात्ताप दिसत नव्हता, असे पोलिसांनी सांगितले.