Student Death: 'स्वप्नात येणाऱ्या आत्म्यांनी' घेतला 16 वर्षाच्या मुलाचा बळी; 60 पेक्षा जास्त वेळा गूगलवर...

Kanpur student suicide : देशभरात रोज अनेक बातम्या समोर येतात, पण काही घटना इतक्या हृदयद्रावक असतात की त्या मन सुन्न करतात. अशीच एक सुन्न करणारी घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Student Death : आरव हा जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये 11वीचा विद्यार्थी होता.
मुंबई:

Student Death : देशभरात रोज अनेक बातम्या समोर येतात, पण काही घटना इतक्या हृदयद्रावक असतात की त्या मन सुन्न करतात. अशीच एक सुन्न करणारी घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे. येथील एका घरात आई-वडिलांच्या एकुलत्या एक मुलाने, आरव मिश्राने, केलेल्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत आहे. 11वीमध्ये शिकणाऱ्या या 16 वर्षांच्या हुशार विद्यार्थ्याने गळफास लावून आपले जीवन संपवले.आरव हा जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये 11वीचा विद्यार्थी होता. तो वर्गातील हुशार विद्यार्थ्यांपैकी एक असल्यामुळे त्याचे शिक्षक आणि मित्रही या घटनेने स्तब्ध झाले आहेत.

सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आरवने अत्यंत धक्कादायक माहिती लिहिली आहे. त्याने लिहिले आहे की, त्याला स्वप्नात काही चेहरे दिसायचे, जे त्याला स्वतःला किंवा कुटुंबाला मारून टाकण्यास सांगायचे. त्याला या 'आत्मां'पासून धोका आहे आणि त्या त्याला कुटुंबाला मारण्यासाठी दबाव आणत होत्या.

'भूत-प्रेतांच्या भीतीने' उचलले पाऊल

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरव मानसिक त्रासात होता आणि त्याला 'वरच्या शक्ती'चे (भूत-प्रेत) भास होत होते. त्याचे काका संजय पांडे यांनी सांगितले की, "तो सांगायचा की त्याला चार-चार चेहरे दिसतात. ते त्याला 'कोणाला तरी मारून टाक किंवा स्वतः मरून जा' असे सांगतात." दिवाळीपूर्वी त्याने या त्रासाबद्दल आपल्या बहिणीला सांगितले होते आणि तिने आईला माहिती दिली होती.

( नक्की वाचा : Satara Doctor Suicide Case : फोटोवरून वाद, शेवटचा कॉल... डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वीची धक्कादायक माहिती उघड )
 

घरातील लोक छठ पूजेसाठी भागलपूर येथे गेले होते, तर त्याची बहीण युनिव्हर्सिटीमध्ये गेली होती. घरात कुणी नसताना त्याने हे भयानक पाऊल उचलले.

Advertisement

मुलाचा मृतदेह पाहून आई-वडील आणि बहिणीचा आक्रोश थांबत नव्हता. शवविच्छेदनानंतर जेव्हा कुटुंबीय मृतदेह घेण्यासाठी पोहोचले, तेव्हा आईने टाहो फोडला. "आम्ही तुला सोडून का गेलो? बाळा, परत ये! तूझ्याशिवाय आमचा कोण आधार आहे?" आईच्या या विलापाने उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

पोलिसांनी काय सांगितलं?

कानपूरचे एसीपी अमित चौरसिया यांनी सांगितले की, आरव गेल्या 1 वर्षापासून मानसिक तणावात होता. त्याने बहिणीला सांगितले होते की, त्याला स्वप्नात भीतीदायक चेहरे दिसतात, जे त्याला स्वतःच्या मृत्यूसाठी किंवा आई-वडील आणि बहिणीच्या हत्येसाठी सांगत.

Advertisement

बहीण घरी परतल्यावर दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. आतमध्ये आरवचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

( नक्की वाचा : Shocking News: सौदी अरेबियात पती, भारतात पत्नी, Video कॉलवर झाला वाद, बायकोसमोरच तरुणानं... )
 

'सिझोफ्रेनिया' आजाराची शक्यता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरव गेल्या 1 वर्षापासून 'सिझोफ्रेनिया' (Schizophrenia) नावाच्या मानसिक आजाराने त्रस्त असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या अवस्थेत मतिभ्रम (Hallucination) होण्याची शक्यता असते आणि त्यात आत्मसमर्पण किंवा इतरांना मारण्याचे आदेश देणारे 'आवाज' ऐकू येतात. पोलीस तपासात हेही उघड झाले आहे की, आरवने या आजारावर आणि त्याच्या इलाजावर गूगलवर 60 ते 65 वेळा सर्च केला होता. पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक दिशेने तपास करत आहेत.
 

Advertisement
Topics mentioned in this article