Karnataka ex-babu Rs 30 crore assets: 24 घरे, 4 प्लॅट, 40 एकर शेती, 350 ग्रॅम सोने, 1.5 किलो चांदी आणि चार आलिशान गाड्या.. ही संपत्ती एखाद्या बड्या उद्योजकाची असेल असं तुम्हाला वाटेल. मात्र असं अजिबात नाही. फक्त 15,000 पगार असणाऱ्या एका माजी क्लर्कच्या घरात सापडलेल्या या घबाडाने देशभरात खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील कोप्पल येथे राहणाऱ्या एका माजी लिपिकाच्या घरात ही संपत्ती सापडली. या छापेमारीत तब्बल 30 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
लोकायुक्त आणि कोप्पलचे आमदार के. राघवेंद्र हितनल यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा छापा टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे निदागुंडी आणि माजी केआरआयडीएल अभियंता झेड.एम. चिंचोलकर यांनी 96 अपूर्ण प्रकल्पांसाठी बनावट कागदपत्रे तयार करून ७२ कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
EMI थकले म्हणून बँकवाले बायकोला घेऊन गेले; खासगी बँक कर्मचाऱ्यांचा संतापजनक कृत्य
कर्नाटक रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड (केआरआयडीएल) मध्ये २० वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या एका माजी लिपिकाच्या घरी छापेमारी करण्यात आली. केआरआयडीएलमध्ये 72 कोटी रुपयांच्या संशयास्पद गैरव्यवहारासंदर्भात हा छापा टाकण्यात आला. यावेळी सापडलेली संपत्ती पाहून अधिकारीही अवाक झाले.
कलाकप्पा निदागुंडी हे कोप्पल येथील केआरआयडीएलमध्ये माजी आउटसोर्स लिपिक होते. त्यांचा पगार फक्त 15,000 रुपये होता. मात्र त्यांच्यावर दोन दशकांत अंदाजे 30 कोटी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा आरोप झाला आहे. लोकायुक्त आणि कोप्पलचे आमदार के. राघवेंद्र हितनल यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा छापा टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे निदागुंडी आणि माजी केआरआयडीएल अभियंता झेड.एम. चिंचोलकर यांनी 96 अपूर्ण प्रकल्पांसाठी बनावट कागदपत्रे तयार करून 72 कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
(नक्की वाचा- VIDEO: हे वागणं बरं नव्हं! नवी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं मंत्र्यांसमोर लोटांगण)
लोकायुक्त अधिकाऱ्यांनी प्रगती नगर येथील निदागुंडी यांच्या निवासस्थानी छापा टाकल्यानंतर गुरुवारी हे प्रकरण उघडकीस आले. या कारवाईदरम्यान, अधिकाऱ्यांना २४ घरे, सहा भूखंड, ४० एकरपेक्षा जास्त शेती जमीन, १ किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने आणि अनेक वाहने सापडली. जप्त केलेल्या कागदपत्रांवरून अतिरिक्त बेकायदेशीर मालमत्ता असल्याचेही सूचित होते. काही मालमत्ता निदागुंडीच्या पत्नी आणि भावाच्या नावाने नोंदणीकृत असल्याचे आढळून आले.